नीटच्या परीक्षेत ‘या’ लोकांना नो एन्ट्री, काय आहेत गाईडलाईन; चूक केली तर…

इंडियन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET परीक्षा घेतली जाते. यंदाची ही परीक्षा वादात सापडल्याचे बघायला मिळतंय. आता NEET 23 जून रोजी होणार आहे. उमेदवारांनी या परीक्षेला जाण्याच्या अगोदर काही गाईडलाईन फॉलो करणे अत्यंत आवश्यक आहे.

नीटच्या परीक्षेत 'या' लोकांना नो एन्ट्री, काय आहेत गाईडलाईन; चूक केली तर...
NEET Exam
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 2:13 PM

इंडियन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET म्हणजेच राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. NEET परीक्षा UG आणि PG अशा दोन स्तरांवर साधारणपणे घेतली जाते. NEET PG परीक्षा 23 जून 2024 (रविवार) रोजी होणार आहे. नीट परीक्षेचा वाद कोर्टात गेल्यानंतर ही परीक्षा होतंय. NBE natboard.edu.in या साईटवर जाऊन तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने NEET PG परीक्षेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे शेअर केली आहेत, जी विद्यार्थ्यांना फॉलो करणे अत्यंत आवश्यक आहे.

हेच नाही तर जे उमेदवार या गोष्टी फॉलो करणार नाहीत, अशांना NEET PG परीक्षा केंद्रात प्रवेशही दिला जाणार नाहीये. जर एखाद्या उमेदवाराने परीक्षा केंद्रावर काही गडबड गोंधळ केला तर अशा विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावरून बाहेर काढले जाऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांनी अशी चूक करू नये, त्यामुळे भविष्य देखील धोक्यात येऊ शकते.

तुम्ही जर NEET PG परीक्षेसाठी अर्ज केला असेल आणि परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचलात. मात्र, तुमच्यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे नसतील तर अशावेळी तुम्हाला परीक्षा केंद्रावर प्रवेश हा दिला जाणार नाही. प्रवेशपत्र, सरकारने जारी केलेला वैध फोटो ओळख पुरावा म्हणून आपल्याला सोबत ठेवावा लागेल.

NEET PG परीक्षा सुरू होण्याच्या किमान अर्धा तास अगोदर तुम्हाला परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल. थोडा जरी उशीर तुम्हाला परीक्षा केंद्रावर पोहचण्यास झाला तरीही तुम्हाला प्रवेश हा दिला जाणार नाहीये. NEET PG परीक्षा केंद्रात प्रवेशपत्र (NEET PG 2024 Admit Card) सोबतच, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी काहीतरी सोबत असावे.

परीक्षा केंद्रावर येताना मोबाईल फोन, इअर फोन, स्मार्ट घड्याळ, ब्लूटूथ, कॅल्क्युलेटर इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणे सोबत घेऊन येण्यास सक्त मनाई करण्यात आलीये. NEET PG परीक्षेला येताना उमेदवारांनी या गोष्टींची काळजी घ्यावी. यंदाची NEET परीक्षा चांगलीच वादात सापडल्याचे बघायला मिळतंय. अनेक आरोप करण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.