CBSE Board Exam 2021 : सीबीएससीने लॉन्च केले ई-परीक्षा पोर्टल, आता परीक्षा देणे आणखी सोपे

विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान त्यांना मिळावे म्हणून सीबीएसई बोर्डाने एक ई-परीक्षा (e-pareeksha portal) पोर्टल लॉन्च केले आहे. (cbse board launch e pariksha portal)

CBSE Board Exam 2021 : सीबीएससीने लॉन्च केले ई-परीक्षा पोर्टल, आता परीक्षा देणे आणखी सोपे
E PORTAL
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 4:22 PM

मुंबई : देशात कोरोना महामारीचा संसर्ग नव्याने वाढला आहे. रोज हजारोंच्या संख्येने कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम 30 टक्क्यांनी कमी केला आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ असताना दुसरीकडे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान त्यांना मिळावे म्हणून सीबीएसई बोर्डाने एक ई-परीक्षा (e-pareeksha portal) पोर्टल लॉन्च केले आहे. cbse.gov.in या वेबसाईटवर हे पोर्टल देण्यात आले आहे.  (CBSE board launch E pariksha portal for CBSE exam 2021 know all detail information)

ई-पोर्टलमुळे विद्यार्थ्यांच्या समस्यांचे समाधान

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात  हाहा:कार उडाला आहे. हा विचार लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यावर भर देण्यात आला. येत्या 4 मेपासून सीबीएसई बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होणार आहेत. त्याआधी बोर्डाने 2021 या शैक्षणिक वर्षात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई-परीक्षा पोर्टल लॉन्च केलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थांना परीक्षा देण्यासाठी मदत होईल. विद्यार्थ्यांनी ई-परीक्षा पोर्टल या लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती मिळू शकेल. तसेच परीक्षेसंदर्भात आल्यानंतर त्या-त्या सेक्शनमध्ये जाऊनसुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या अडचणींचे समाधान मिळवता येऊ शकेल. आपला युजर आयडी, पासवर्ड आणि सिक्योरिटी पिन टाकल्यानंतर विद्यार्थ्यांना हे पोर्टल वापरता येईल.

पोर्टलचे वेगवेगळ्या भागात वर्गीकरण

विद्यार्थ्यांना हे पोर्टल वारण्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून, ई-परीक्षा पोर्टलचे (e-pareeksha portal) अनेक भाग करण्यात आले आहेत. या पोर्टलच्या मदतीने विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र, प्रॅक्टिकल केंद्रात बदल करण्यात येईल. याच पोर्टलवर 10 वीच्या विद्यार्थ्यांचे इंटरनल असेसमेंट (CBSE Internal Assessment) आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांचे इंटरनल ग्रेड (CBSE Internal Grade) अपलोड केले जातील.

दरम्यान, सीबीएसई बोर्डाने हे ई-पोर्टल सुरु केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. त्यांच्या परीक्षेसंदर्भातील सर्व अडचणींचे समाधान याच मंचावर सापडणार आहे.

इतर बातम्या :

CBSE Board Exam 2021 : कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईची मोठी घोषणा, बाधित विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा पुढे ढकलणार

JEE MAIN 2021| जेईई मेन एप्रिल मे सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

मोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, तारीखही ठरली

(CBSE board launch E pariksha portal for CBSE exam 2021 know all detail information)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.