Solapur : अखेर डिसले गुरुजींच्या राजीनाम्यावर निर्णय..! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर वाढला होता ‘सस्पेन्स’
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळूनही एखाद्यावर राजीनामा देण्याची वेळ येते यावरुन मोठा विरोध निर्माण झाला होता. समाजमाध्यमातूनही शिक्षण विभागाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, शिक्षकाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानुसार रणजितसिंह डिसले हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यनंत्री यांच्या भेटीला गेले होते.

सोलापूर : (Ranjitsingh Disale) रणजितसिंह डिसले यांना (Global Teacher Award) ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर एका रात्रीतून ते प्रसिध्दी झोकात आले होते. आता हा पुरस्कार प्रदान होऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन डिसले गुरुजी हे चर्चेत राहिलेले आहेतच. मध्यंतरी त्यांनी परदेशी शिष्यवृत्तीसाठी शिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. त्यावरुन पुन्हा त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सबंध राज्यात झाली होती. एका ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाने थेट पदाचा (Resignation) राजीनामा दिल्याने ही चर्चा थेट उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गेली होती. दरम्यानच्या काळातील या सर्व घडामोडीनंतर अखेर ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. गतमहिन्यात त्यांनी राजीनामा दिला होता पण त्यावर निर्णय घेण्यात आलेला नव्हता.
प्रशासकीय कारणास्तव राजीनामा नामंजूर
रणजितसिंह डिसले परदेशी शिष्यवृत्तीसाठी आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. शिवाय प्रशासकीय यंत्रणा आणि डिसले गुरुजी यांच्यात सातत्याने मतभेद हे होतेच. त्यामुळे डिसले गुरुजी यांच्या राजीनाम्यानंतर काय होणार याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले होते. अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यावर निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कारणास्तव त्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे अध्यापनाचे कामकाज हे सुरुच राहणार आहे.
गुरुजी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळूनही एखाद्यावर राजीनामा देण्याची वेळ येते यावरुन मोठा विरोध निर्माण झाला होता. समाजमाध्यमातूनही शिक्षण विभागाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, शिक्षकाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानुसार रणजितसिंह डिसले हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यनंत्री यांच्या भेटीला गेले होते. गत महिन्यात 7 जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला होता तर 4 ऑगस्ट रोजी त्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे.
नेमका राजीनामा कशामुळे दिला होता?
डिसले गुरुजींनी मी वैयक्तिक कारणामुळे शिक्षक पदाचा राजिनामा देत असल्याचे नमुद केले आहे. माढा पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण विभागात त्यांनी 7 जुलै रोजी स्वत:येऊन अर्ज दिला होता. माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. गटशिक्षण अधिकारी बंडु शिंदे यांनी डिसलेंचा अर्ज व त्याचे सेवा पुस्तक प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना पाठवले होता. त्यामुळे यावर काय निर्णय होणार याची उत्सुकता शिघेला पोहचली असताना त्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे.
