AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra HSC Result 2021 : दहावीच्या निकालातून धडा, बोर्डाच्या प्लॅनिंगला यश, सर्व वेबसाईटस व्यवस्थित सुरु

Maharashtra HSC Result 2021: दहावी निकालावेळी उद्भवलेली परिस्थिती बारावीच्या निकालावेळी टाळण्यात बोर्डाला यश आल्याचं दिसून येत आहे.

Maharashtra HSC Result 2021 : दहावीच्या निकालातून धडा, बोर्डाच्या प्लॅनिंगला यश, सर्व वेबसाईटस व्यवस्थित सुरु
बारावी निकाल वेबसाईट
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 5:00 PM
Share

Maharashtra HSC Result 2021 मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची टक्केवारी जाहीर केली. बारावीचा निकाल 99.63 टक्के लागला आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. दुपारी 4 वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालाची प्रत उपलब्ध होत आहे. बोर्डानं बारावी निकालासाठी जारी केलेल्या https://hscresult.11 thadmission.org.in,  https://msbshse.co.in , hscresult.mkcl.org   आणि mahresult.nic.in या वेबसाईट आतापर्यंत व्यवस्थित सुरु आहेत. दहावी निकालावेळी उद्भवलेली परिस्थिती टाळण्यात बोर्डाला यश आल्याचं दिसून येत आहे.

 दहावीच्या निकालाच्या अनुभवावरुन वेबसाईटची संख्या वाढवली

बारावीच्या निकालाच्या निमित्तानं टीव्ही 9 मराठीनं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बातचीत केली. मागच्या वेळचा अनुभव बघता आपण पूर्ण तयारी केलेली आहे. यावेळी आम्ही पाच लिंक देत आहोत. तांत्रिक लोकांशी चर्चा करुन पूर्ण काळजी घेत आहोत. बारावीच्या निकालाच्या वेळी व्यवस्थापन करण्यास बोर्डाला सांगितलं आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा देते. विद्यार्थ्यांनी भविष्यात महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

विद्यार्थ्यांनो या वेबसाईट्सवर तुमचा निकाल पाहा

इयत्ता बारावीचा निकाल आज दुपारी चार वाजता लागणार असून तो ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल. त्यासाठी एकूण चार वेबसाईट्स जारी करण्यात आल्या आहेत. या वेसबाईट्स खालीलप्रमाणे आहेत.

बारावीचा निकाल कुठे पाहायचा?

विद्यार्थी त्यांचा निकाल https://hscresult.11 thadmission.org.in,  https://msbshse.co.in , hscresult.mkcl.org   आणि mahresult.nic.in. या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

बारावीचा निकाल कसा पाहाल ?

?निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

?त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

?त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

?त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.

?यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल

?निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

इतर बातम्या:

Maharashtra HSC Result 2021 declared LIVE Updates : बारावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर, निकालासाठी इथे क्लिक करा

HSC Result 2021 Maharashtra Pass Percentage : बारावीचा निकाल 99.63 टक्के, निकालासाठी इथे क्लिक करा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.