NEET UG समुपदेशन कधीपासून? महत्त्वाच्या तारखा, अर्ज करण्याच्या स्टेप्स

एनईईटी परीक्षेला बसलेले उमेदवार neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा एनईईटी-यूजी निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

NEET UG समुपदेशन कधीपासून? महत्त्वाच्या तारखा, अर्ज करण्याच्या स्टेप्स
Medical NEET UG
Image Credit source: Social Media
रचना भोंडवे

|

Sep 12, 2022 | 10:45 AM

नीट-यूजी 2022 चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता मेडिकलचे विद्यार्थी समुपदेशन प्रक्रिया (Medical Student Counselling) सुरू होण्याची वाट पाहत आहेत. एनईईटी यूजी समुपदेशन 28 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते. ही एक टेंटेटिव्ह तारीख आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) 7 सप्टेंबर रोजी नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रॅज्युएट (NEET UG) चा निकाल जाहीर केला. एनईईटी परीक्षेला बसलेले उमेदवार neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा एनईईटी-यूजी निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

आरोग्य सेवा महासंचालकांची (DGHS) वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) ऑल इंडिया कोटा (AIQ) एमडीशनसाठी समुपदेशन करते.

NEET UG समुपदेशनासाठी अर्ज कसा करावा?

  • समुपदेशनासाठी अर्ज करण्यासाठी वैद्यकीय समुपदेशन समितीच्या mcc.nic.in संकेतस्थळाला भेट द्या.
  • होमपेजवर UG Medical Counselling क्लिक करा.
  • रजिस्ट्रेशनसाठीची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • मागितलेली माहिती भरा आणि पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करा.
  • लॉगइन करून अर्ज भरा.
  • कागदपत्रे अपलोड करा, नोंदणी शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • नीट समुपदेशनचा पर्याय निवडा, तो भरा आणि लॉक करा.
  • जागा वाटपाचा निकाल जाहीर झाल्यावर आपले कॉलेज तपासा.
  • प्रवेशासाठी दिलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये जा.

नीट समुपदेशनापूर्वी एमसीसी आपल्या अधिकृत वेबसाइटवर सीट मॅट्रिक्स म्हणजेच कोणत्या संस्थेत किती जागा असणार आहेत, याची घोषणा करणार आहे.

समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना neet.nta.nic.in भेट देऊन आपले नीट रँक कार्ड डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यांना नीटचा अर्जही तयार ठेवावा लागणार आहे.

एनईईटी यूजी परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती, ज्यासाठी 18.72 उमेदवारांनी नोंदणी केली होती. मात्र, नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ 95 टक्के विद्यार्थीच परीक्षेला बसले होते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें