AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IIT कॉलेजमध्ये स्किल डेव्हलपमेंट कोर्स! परीक्षा नाही, लवकर अर्ज करा

या अभ्यासक्रमांसाठी बेसिक ते ॲडव्हान्स स्तरापर्यंत नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

IIT कॉलेजमध्ये स्किल डेव्हलपमेंट कोर्स! परीक्षा नाही, लवकर अर्ज करा
Skill development course in IIT Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 22, 2022 | 6:07 PM
Share

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मंडी यांनी मोफत कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांमुळे उमेदवारांना औद्योगिक, शैक्षणिक आणि संशोधन दृष्टिकोनातील त्यांची क्षमता वाढविण्यात मदत होईल. या अभ्यासक्रमांसाठी बेसिक ते ॲडव्हान्स स्तरापर्यंत नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आयआयटी मंडी iitmandi.ac.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. हिमाचल प्रदेश कौशल्य विकास महामंडळ अर्थात HPKVN योजनेअंतर्गत पाच वेगवेगळे लघु अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

आयआयटी मंडीचे हे अल्पकालीन अभ्यासक्रम महिनाभरात पूर्ण होणार असून, त्यासाठी उमेदवारांना नोंदणीवर एक पैसाही द्यावा लागणार नाही.

संस्था उमेदवारांना विनामूल्य भोजन, निवास आणि अध्यापन साहित्य देखील प्रदान करेल. या अभ्यासक्रमामुळे तरुणांना खऱ्या आयुष्यातल्या इंजिनीअरिंगच्या समस्यांना तोंड द्यायला शिकवलं जाणार आहे, जेणेकरून त्यांना जॉब मार्केटसाठी तयार राहता येईल.

या अभ्यासक्रमामुळे पंतप्रधान कौशल विकास योजनेअंतर्गत (PMKVY) ऑटोमेशन आणि इतर नोकऱ्यांसाठी कौशल्य विकसित करण्यात मदत होणार आहे.

IIT Mandi Short Course आयटी, डिप्लोमा इंजिनिअर्स, इंजिनीअरिंग स्टुडंट्स, वर्किंग इंजिनीअर्स, पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएचडी लेव्हलचे विद्यार्थी, हिमाचल प्रदेशच्या टेक्निकल इन्स्टिट्यूशनचे शिक्षक/ फॅकल्टी मेंबर्स यांच्यासाठी हा कोर्स आहे.

ज्यांना आपले वैज्ञानिक ज्ञान वाढवायचे आहे आणि अभियांत्रिकी संशोधनात विस्तार करायचा आहे अशांसाठी हा कोर्स असणारे.

नोंदणी करण्यासाठी थेट लिंक

कोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार?

  • Hands-On Course on Embedded Systems
  • Model Predictive Control for Industrial Systems
  • Hands-On Training of Computational Fluid Dynamics
  • Finite Element Modelling for Engineering
  • Hands-On Course on Product Design and Manufacturing
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.