AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yogendra Yadav : प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांचं भाकीत काय? भाजपा किती जागा जिंकणार?

Prashant kishor vs Yogendra Yadav : लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. आज देशात सहाव्या टप्प्याच मतदान होत आहे. सत्तेवर कोण येणार? याची उत्सुक्ता शिगेला पोहोचलीय. दरम्यान प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव या दोन्ही निवडणूक जाणकारांनी बिलकुल परस्पर विरुद्ध दावे केले आहेत. आता योगेंद्र यादव यांनी भाजपा किती जागा जिंकणार? केंद्रात सरकार कोण बनवणार? तो आकडा सांगितला आहे.

Yogendra Yadav : प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांचं भाकीत काय? भाजपा किती जागा जिंकणार?
Yogendra YadavImage Credit source: PTI
| Updated on: May 25, 2024 | 9:50 AM
Share

देशात आज सहाव्या टप्प्याच मतदान होत असताना देशात सरकार कोण बनवणार? याची उत्सुक्ता शिगेला पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता फक्त काही दिवस उरले आहेत. येत्या 4 जूनला निकाल जाहीर होतील. पण त्याआधी कोण जिंकणार? यावरुन पैजा लागत आहेत. भाजपाप्रणीत NDA आणि काँग्रेस प्रणीत INDIA आघाडीमध्ये सामना आहे. दोन्ही बाजूंकडून जय-पराजयाचे दावे करण्यात येत आहेत. प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणूक 2024 बद्दल नुकताच एक अंदाज वर्तवला. त्यावरुन सोशल मीडियावर भाजपा समर्थक आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंगलबंदी रंगली आहे. भाजपा 2019 च्या निकालाची पुनरावृत्ती करेल, पण त्यांना 370 जागा जिंकणं जमणार नाही असं प्रशांत किशोर म्हणाले. आता प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी सुद्धा भाकीत वर्तवलय.

प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव यांचे दावे बिलकुल परस्पर विरुद्ध आहेत. योगेंद्र यादव सुद्धा म्हणतात भाजपा तिसऱ्यांदा सरकार बनवेल पण भाजपा किती जागा जिंकणार? या बद्दल त्यांचा अंदाज वेगळा आहे. भाजपाला सलग तिसऱ्यांदा सरकार बनवताना NDA मधील घटक पक्षांची गरज लागेल असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे. प्रशांत किशोर यांनी योगेंद्र यादव यांच्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट X वर शेअर केले आहेत. चालू लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल काय असेल? त्याबद्दल योगेंद्र यादव यांनी सांगितलेले आकडे त्या स्क्रीनशॉटमध्ये आहेत.

काँग्रेसला किती जागा मिळणार?

भाजपाला लोकसभा निवडणुकीत 240 ते 260 जागा मिळतील, असा योगेंद्र यादव यांचा अंदाज आहे. एनडीएमधील घटक पक्षांच 35 ते 45 जागांच योगदान असेल. त्यामुळे ते 275-305 पर्यंत पोहोचतील. योगेंद्र यादव यांच्यामते काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 85 ते 100 जागा मिळतील. इंडिया आघाडीतील घटक पक्षांना 120 ते 135 जागा मिळतील. अशा रितीने विरोधी पक्षांची आघाडी 205 ते 235 जागांपर्यंत पोहोचेल असं योगेंद्र यादव यांचं भाकीत आहेत.

प्रशांत किशोर यांचा अंदाज काय?

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी भाजपाला जवळपास 300 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारविरोधात लोकांच्या मनात फार राग नाहीय असं प्रशांत किशोर यांचं मत आहे. स्वबळावर भाजपाला 370 पर्यंत पोहोचण अशक्य असल्याचा त्यांचा अंदाज आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.