AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे निकालाआधीच ॲक्शन मोडवर, मराठा समाजाला दिले नवे फर्मान; टेन्शन कुणाला?

मनोज जरांगे पाटील येत्या 8 तारखेपासून उपोषणाला बसमार आहेत. कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून उपोषण तूर्तास मागे घेत आहे. मात्र 8 तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जरांगे पाटील यांना पोलीस प्रशासनाची नोटीस नाहीतर समजपत्र आलं आहे. अंतरवाली सराटी येथील काही नागरिकांनी गावामध्ये जातीय सलोखा बिघडत असल्याचे म्हटले आहे. तसेच बाहेरगावातील नागरिकांची गर्दी वाढत असल्याने, महिलांना त्रास होत आहे. गावच्या विकासा कामात अडथळा होत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं या समज पत्रात म्हटलंय.

मनोज जरांगे निकालाआधीच ॲक्शन मोडवर, मराठा समाजाला दिले नवे फर्मान; टेन्शन कुणाला?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 03, 2024 | 8:51 PM
Share

लोकसभा निवडणूक संपताच आता मनोज जरांगे पाटील हे ॲक्शन मोडवर आले आहेत. लोकसभा निकालाला अवघे काही तास बाकी आहेत. त्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला काही सूचना केल्या आहेत. उद्या निकाल आहे. कोणीही विजयी होऊ द्या. कोणीही पराभूत होऊ द्या. तुम्ही जल्लोष करू नका. फोटो पोस्ट करू नका. कुणाचाही जयजयकार करू नका. कुणाच्याही मिरवणुकीत जाऊ नका, असं फर्मानच मनोज जरांगे पाटील यांनी सोडलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या आदेशाने सत्ताधाऱ्यांनाच टेन्शन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आणि कायदा पारीत झाला पाहिजे. त्यासाठी मी 8 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे. कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे कायदा करायला किती दिवस पाहिजेत? सरकार काड्या करत आहे. षडयंत्र करत आहे. लोकांना फोडत आहे. गेले 10 महिने त्यांचे हे षडयंत्र सुरू आहे. मी समाजासाठी जीव द्यायला तयार आहे. आयाबहिणीचं रक्त सांडलंय. मी त्यांच्याशी कधीच बेईमान होणार नाही. पैसा आणि अमिषासाठी बेईमान होणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

शिंदे, फडणवीस यांना विनंती आहे की…

आरक्षणाचा विषय सरकारने गोडीगुलाबीने हाताळावा. तुम्ही जर काड्या केल्या तर असा खुट्टा ठोकीन की तो ट्रॅक्टरनेही बाहेर काढता येणार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत मी 288 मतदारसंघात सर्व जाती धर्माचे उमेदवार उभे करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माझी हात जोडून विनंती आहे की, राजकारण हा माझा मार्ग नाही. मला राजकारणाकडे ओढू नका. मला सग्या सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी हवी आहे, असं ते म्हणाले.

तुमच्या दहा पिढ्या…

तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. आमचे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. बाकी आम्हाला काहीही घेणंदेणं नाही. तुम्ही आमच्याविरोधातील डाव बंद करा. तुमच्या दहा पिढ्या आल्या तरी हे आंदोलन हटणार नाही, असा इशारा देतानाच मराठा समाजाला विनंती आहे की, कोणी निवडून आले तर कोणी पोस्ट सुद्धा करायची नाही. जयजयकार ही करायचा नाही, कुणाच्या मिरवणुकीत जायचे नाही. मराठा समाजाने शांत रहायचे आहे, असं आवाहन त्यांनी केलं.

मी मरायला तयार

आताचं माझं उपोषण मी मरेपर्यंत चालेल. मी मागे हटणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कधीच शत्रू मानले नाही. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. नाही तर मराठा समाजाला मागणारा नव्हे तर देणारा समाज बनावे लागेल. अडथळे माझ्या पाचवीला पुजलेले आहेत. सरकार मला मारायला तयार असले तरी मी मरायला तयार आहे, असंही ते म्हणाले.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.