AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Election Results, Govt Formation 2024 LIVE : नरेंद्र मोदी 9 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार

| Updated on: Jun 07, 2024 | 9:23 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 6 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Election Results, Govt Formation 2024 LIVE : नरेंद्र मोदी 9 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार

किल्ले रायगडावर आज 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय. यानिमित्त हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. संभाजी छत्रपतींच्या हस्ते रायगडावर होणार महापूजा. सुप्रिया सुळे आज पुणे आणि बारामती दौऱ्यावर असून तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच पुण्यात येणार आहेत. सुप्रिया सुळे यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात येणार आहे. राज्यात शनिवारपासून जोरदार पाऊस होईल. मॉन्सून वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. बुधवारी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मॉन्सून गोव्यातच अडखळला आहे. आज तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Jun 2024 05:07 PM (IST)

    कोकण पदवीधर निवडणूक, निरंजन डावखरे उद्या अर्ज भरणार

    कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीने आमदार निरंजन वसंत डावखरे यांच्याकडून उद्या शुक्रवारी (ता. ७) सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज भरण्यावेळी भाजपाच्या प्रमुख लोकप्रतिनिधींबरोबरच कोकणातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

  • 06 Jun 2024 04:20 PM (IST)

    शरद पवार गटाची पत्रकार परिषद

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्ष कार्यकारिणीची येत्या 10 जूनला बैठक बोलवण्यात आली आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त 10 जूनला अहमदनगरमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

  • 06 Jun 2024 04:17 PM (IST)

    चिपळूणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

    चिपळूणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उकाड्यापासून चिपळूणवासियांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे 1 तासापासूम रिमझिम असणारा पाऊस आता जोरदार सुरु झाला आहे. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी सुखावला आहे.

  • 06 Jun 2024 04:01 PM (IST)

    याआधी शपथविधीचा कार्यक्रम हा 8 जून रोजी पार पडणार होता

    या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदी 9 जून रोजी शपथ घेणार आहेत. याआधी शपथविधीचा कार्यक्रम हा 8 जून रोजी पार पडणार होता. शपथविधी सोहळा संध्याकाळी पार पडणार आहे.

  • 06 Jun 2024 03:24 PM (IST)

    काँग्रेस पक्ष कार्यकारणी समितीची ८ जून रोजी बैठक

    काँग्रेस पक्ष कार्यकारणी समितीची ८ जून रोजी बैठक होणार आहे. पक्ष कार्यकारणी समितीच्या बैठकीला सर्व कार्य समितीचे सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. ही बैठक 8 जून रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस मुख्यालयात होणार आहे.

  • 06 Jun 2024 03:18 PM (IST)

    मला असं वाटतं की जनता मला 25 वर्षांपासून निवडून देत आहे: भावना गवळी

    लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर झाले. महाराष्ट्रात भाजप आणि पर्यायाने महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीच्या उमेदवाराचा यवतमाळमध्ये पराभव झाला. महायुतीच्या पराभवानंतर माजी खासदार भावना गवळी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की मला जागा दिली असती तर विजय झाला असता.

    भावना गवळी काय म्हणाल्या?

    मला असं वाटतं की जनता मला 25 वर्षांपासून निवडून देत आहे. परंपरागत ही जागा शिवसेनेची आहे. ही जागा मला दिली असती तर ही जागा निवडून आली असती. लाखाच्या फरकाने मी निवडून आले असते, अशी प्रतिक्रिया भावना गवळी यांनी टीव्ही9 मराठीला दिली.

  • 06 Jun 2024 03:09 PM (IST)

    पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई

    पुणे विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. 78 लाख रुपये किमतीचं सोनं कस्टम विभागाकडून जप्त करण्यात आलंय. दुबई वरून पुण्यात आलेल्या प्रवाशाकडून 24 कॅरेट 1088 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं. आरोपी विमानाच्या सीट खाली लपवून पुण्यात करत होता तस्करी. पुणे पोलिसांच्या कस्टम विभागाकडून आरोपीला बेड्या.

  • 06 Jun 2024 12:59 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये दाखल

    लोकसभा निवडणुकीनंतर आता देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्य हे मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघायला मिळतंय.

  • 06 Jun 2024 12:33 PM (IST)

    शिंदेंवर दबाव होता- भावना गवळी

    मला तिकिट मिळू नये, यासाठी शिंदेंवर दबाव होता, असे मोठे विधान भावना गवळी यांनी केले आहे.

  • 06 Jun 2024 12:20 PM (IST)

    अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करा- जेडीयूची मागणी

    किंगमेकर ठरलेल्या जेडीयूकडून नव्याने तयार होणाऱ्या केंद्र सरकारकडे मागणी. अग्निवीर योजनेचा पुनर्विचार केला जावा यासाठी नितीश कुमार आग्रही

  • 06 Jun 2024 12:03 PM (IST)

    एनडीएच्या बैठकीत मोठा निर्णय

    पंतप्रधान मोदींकडून खातेवाटपासाठी ३ जणांवर जबाबदारी. अमित शहा , राजनाथ सिंह , आणि जे पी नडा यांच्यावर जबाबदारी. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे यांच्याशी स्वतंत्र बैठका

  • 06 Jun 2024 12:00 PM (IST)

    वसंत मोरे यांचे डिपॉझिट जप्त

    लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचं डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यांना केवळ 32 हजार 12 मते मिळाली आहेत. मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर वगळता उर्वरित सर्व म्हणजे 33 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

  • 06 Jun 2024 11:50 AM (IST)

    राज्यात नाही चालले मोदी मॅजिक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या काळात महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी राज्यात प्रत्येक टप्प्यात तळ ठोकला. राज्यात 19 सभा, रोड शो आणि सर्व यंत्रणा दिमतीला असताना पण मोदी मॅजिक काही चालले नाही. 15 उमेदवारांचा पराभव झाला.

  • 06 Jun 2024 11:40 AM (IST)

    अरविंद सावंत यांचा फडणवीसांना टोला

    ज्यांना राजीनामा द्यायचा आहे. त्यांना नाटक करायची गरज नसते. इकडे जा तिकडे जा अस करायची गरज नसते. त्यांनी सरळ राजीनामा देऊन मोकळं व्हायचं असतं, असा टोला उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी फडणवीसांना लगावला.

  • 06 Jun 2024 11:30 AM (IST)

    लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी

    लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी काम करतील. लवकरच काँग्रेस कडून अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक होणार. बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. इंडिया आघाडीच्या वतीने एकत्रितपणे राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते पद दिले जाणार आहे.

  • 06 Jun 2024 11:20 AM (IST)

    संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका

    लोकसभा निवडणुकीच्या निकालाच चित्र स्पष्ट झाल्यानंतरही राज्यातील राजकारणातील कडवटपणा कमी झालेला नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई असल्याची जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

  • 06 Jun 2024 11:10 AM (IST)

    टायगर अभी जिंदा है

    जळगावच्या वर्तमानपत्रात एकनाथ खडसे यांच्यावर आलेल्या जाहिरातीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. टायगर अभी जिंदा है अशा आशयाची एकनाथ खडसे यांचे विषयीची आज जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकनाथ खडसे मित्रपरिवार समर्थकांकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

  • 06 Jun 2024 11:00 AM (IST)

    युगेंद्र पवार यांच्याविरोधात अजित पवार आक्रमक

    अजित पवारांनी युगेंद्र पवारांना बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदावरुन हटविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युगेंद्र पवार बारामती कुस्ती संघाचे अध्यक्ष होते.बैठकीला उपस्थित न राहिल्याने कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक संपताच युगेंद्र पवारांना हटवल्याने चर्चांना उधाण आले आहे.

  • 06 Jun 2024 10:50 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात बर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला भीषण आग

    पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात सकाळच्या सुमारास पुन्हा एका रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. या आगीमध्ये शेजारी असणाऱ्या तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. कुदळवाडी परिसरातील आर. के. ट्रेडर्स मॅन्युफॅक्चरिंग आणि तिच्या शेजारी असणाऱ्या अन्य दोन कंपन्यांना भीषण आग लागली आहे. गुरुवार असल्याने कंपन्यांमध्ये कोणतेही कर्मचारी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. अग्निशमन दलाच्या 15 पेक्षा अधिक बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

  • 06 Jun 2024 10:48 AM (IST)

    सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग

    नवी दिल्ली – 18 व्या लोकसभेच्या स्थापनेच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. भेट घेत नवनिर्वाचित खासदारांची यादी राष्ट्रपतींना सुपूर्द करणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतील.

  • 06 Jun 2024 10:40 AM (IST)

    दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक

    दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. थोड्यात वेळात जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

  • 06 Jun 2024 10:30 AM (IST)

    वर्षा गायकवाड घेणार उद्धव ठाकरेंची भेट

    मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर दुपारी १२ वाजता भेट घेणार आहेत. वर्षा गायकवाड या उद्धव ठाकरेंचे आभार मानण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. ठाकरे कुटुंबाने वर्षा गायकवाड यांना मतदान केलं होतं. त्यांना निवडून येणार असा आशीर्वाद दिला होता. आभार व्यक्त करून पुढील वाटचाल ठरवण्यासाठी वर्षा गायकवाड मातोश्रीवर जाणार आहेत.

  • 06 Jun 2024 10:20 AM (IST)

    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज सुप्रिया सुळे पुण्यात

    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज सुप्रिया सुळे पुण्यात येणार आहेत. सुप्रिया सुळे आज पुण्यात निसर्ग मंगल कार्यालयात भेटीगाठी घेणार आहेत. सुप्रिया सुळेंच्या स्वागताची निसर्ग मंगलकार्यालय परिसरात जंगी तयारी करण्यात आली आहे. रांगोळी काढत ढोल ताशा पथक तैनात करण्यात आलं आहे.

  • 06 Jun 2024 10:10 AM (IST)

    वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचं डिपॉझिट जप्त

    लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. वसंत मोरे यांना केवळ 32 हजार बारा मते मिळाली आहेत. मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर वगळता उर्वरित सर्व म्हणजे 33 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत. डिपॉझिट परत मिळण्यासाठी किमान एक लाख 84 हजार मतं मिळणे गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी भरलेलं डिपॉझिट म्हणजेच पंचवीस हजार रुपयांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

  • 06 Jun 2024 10:04 AM (IST)

    Maharashtra News : फडणवीस पुरुष आनंदीबाई – संजय राऊत

    पेशवेकाळात आनंदीबाई होत्या.त्यांची आठवण ज्यासाठी काढली जाते, तसे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई आहेत अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

  • 06 Jun 2024 09:45 AM (IST)

    Maharashtra News : मोदींनी भाजपाकडूनच विरोध – संजय राऊत

    “मोदी-शाहनी संघालाच आपला गुलाम करण्याचा प्रयत्न केला. मोदींनी भाजपाकडूनच विरोध. फडणवीसांना लोकांनीच घरी पाठवलं. फडणवीसांकडून राजकारणातील एक पिढी संपवण्याच काम. फडणवीसांनी सूडाच राजकारण केलं” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

  • 06 Jun 2024 09:23 AM (IST)

    Maharashtra News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली खासदारांची बैठक

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली खासदारांची बैठक. आज दुपारी 1 वाजता सर्व खासदारांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक. रात्री मुख्यमंत्री सर्व खासदारांसोबत दिल्लीला जाणार. दिल्लीत सरकार स्थापनेच्या वेळी प्रत्यक्ष हजर राहणार. जिंकून आल्यानंतर खासदारांची पहिली बैठक वर्षा बंगल्यावर असल्याने याकडे सगळ्यांचं लक्ष. केंद्रात दोन मंत्रीपदे आणि एक केंद्रीय राज्य मंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. खासदार प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे आणि श्रीकांत शिंदे हे मंत्रीपदाच्या रेसमध्ये.

  • 06 Jun 2024 09:21 AM (IST)

    Maharashtra News : डोंबिवली अमुदान केमिकल स्फोटातील दोन मृतांची ओळख पटली

    डोंबिवली अमुदान केमिकल स्फोटातील दोन मृतांची DNA चाचण्यांमुळे ओळख पटली. विशाल पौडवाल (40) आणि मनीष दास (22) अशी ओळख पटलेल्या मृतांची नावे आहेत. डीएनए चाचणीच्या रिपोर्ट्नंतर पोलिसांनी आणि शास्त्रीनगर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले. अजूनही सात जणांचा DNA रिपोर्ट प्रतिक्षेत.

  • 06 Jun 2024 08:56 AM (IST)

    केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेणार भेट

    लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी नारायण राणे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.

  • 06 Jun 2024 08:49 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता, मोदी-शहांची भेट घेणार

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झाल्यानंतर या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.

  • 06 Jun 2024 08:42 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील रायगडावर दाखल, 8 तारखेपासून पुन्हा आंदोलन सुरु करणार

    मनोज जरांगे पाटील हे रायगडावर दाखल झाले असून आज ते शिवरायांचे दर्शन घेणार आहेत. येत्या 8 तारखेपासून  जरांगे हे पुन्हा आंदोलन सुरु करणार आहेत.  ते छत्रपती संभाजी राजे यांचीही भेट घेणार आहेत.

  • 06 Jun 2024 08:35 AM (IST)

    चेंबूर कॅम्प येथे गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट, अनेक जखमी

    चेंबूर कॅम्प येथे गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन अनेक जण जखमी झाले आहे. मुख्य रस्त्यावरील दुकानात हा स्फोट झाला आहे. जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत.

  • 06 Jun 2024 08:21 AM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण, कोल्हापुरातील नवीन राजवाड्यात विशेष कार्यक्रम

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील नवीन राजवाड्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. खासदार शाहू छत्रपती आणि छत्रपती कुटुंबातील अन्य सदस्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा. नऊ वाजून पाच मिनिटांनी शिवराज्याभिषेकाच्या मुख्य कार्यक्रमाला होणार सुरुवात. तत्पूर्वी मराठा लाईफ इन्फंट्री (आर्मी बँड) करून वाद्याचं सादरीकरण केलं जाणार आहे.

Published On - Jun 06,2024 8:19 AM

Follow us
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.