Kerala Assembly Election 2021: डावे, उजवे, काँग्रेस सर्वांनाच पाठिंबा, कुणालाच राग नको; अभिनेते मोहनलाल यांनी केलं सर्वांना खुश

पाच राज्यांच्या निवडणुकीत स्थानिक कलाकारांना घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली आहे. (Mohanlal praises Metroman E Sreedharan )

Kerala Assembly Election 2021: डावे, उजवे, काँग्रेस सर्वांनाच पाठिंबा, कुणालाच राग नको; अभिनेते मोहनलाल यांनी केलं सर्वांना खुश
mohanlal

तिरुवनंतपुरम: पाच राज्यांच्या निवडणुकीत स्थानिक कलाकारांना घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली आहे. केरळात मात्र कंपलिक्ट अॅक्टर म्हणून ओळखले जाणारे अभिनेते मोहनलाल यांनी सर्वच पक्षांच्या उमेदवारांना खुश केलं आहे. मोहनलाल यांनी एलडीएफ, युडीएफ आणि भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी या पक्षांना पाठिंबा दिल्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. (Mohanlal praises Metroman E Sreedharan )

मोहनलाल यांनी भाजपचे उमेदवार ई. श्रीधरन यांना पाठिंबा दिला आहे. तसेच एलडीएफचे उमेदवार के. बी. गणेश कुमार आणि युडीएफचे उमेदवार शिबू बेबी जॉन यांना पाठिंबा दिला आहे. केबी गणेश कुमार हे मल्याळम सिनेसृष्टीतील अभिनेते आहेत. ते कोल्लममधील पथनापुरममधून लढत आहेत. तर शिबू बेबी जॉन हे मोहनलाल यांचे मित्र आहेत. ते छावरा विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत. तसेच त्यांनी श्रीधरन यांनाही पाठिंबा दिला आहे.

काय म्हणाले मोहनलाल?

श्रीधरन यांनी देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मेट्रोचं जाळं निर्माण केलं आहे. त्यांनी कोकण रेल्वेचा ढाचा तयार केला. देशाला त्यांच्या सेवेची गरज आहे. त्यामुळे देश अधिक विकास पावेल. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देत आहे, असं मोहनलाल यांनी म्हटलं आहे. मोहनलाल यांच्या या व्हिडीओवर श्रीधरन यांनी आभार व्यक्त केले आहेत. तुमचं फिल्म इंडस्ट्रीतील योगदान मोठं आहे. आपण सर्व मिळून नवा केरळ घडवू या, असंही श्रीधरन यांनी म्हटलं आहे.

6 एप्रिल रोजी मतदान

केरळ विधासभेच्या 140 जागांसाठी निवडणुका होत आहेत. येत्या 1 जून रोजी केरळ विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ संपत आहे. केरळमध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. केरळात 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. (Mohanlal praises Metroman E Sreedharan )

 

संबंधित बातम्या:

Kerala Assembly Election 2021 : प्रियंका गांधींची चूक भाजप खासदाराने सुधारली!, जाणून घ्या संपूर्ण प्रकार

राहुल गांधी, केवळ मुलींच्याच कॉलेजात जातात… माजी खासदाराची जीभ घसरली

नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी एकही जागा मिळणार नाही, त्यांनी वेळ वाया घालवू नये,काँग्रेस नेत्याचा टोला

(Mohanlal praises Metroman E Sreedharan )

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI