44 वर्षाची सुंदर अभिनेत्री, जिला ‘पनौती’ म्हणून ओळखायचे लोक, मात्र, हिरानी यांच्या चित्रपटातून बदलले नशीब
बॉलिवूडमधील 44 वर्षांची ही सुंदर अभिनेत्री, जिला इंडस्टीमध्ये पनौती म्हणून ओळखायचे लोक. मात्र, राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटातून बदलले नशीब.

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्जा हिने आपल्या करिअरमधील सुरुवातीच्या संघर्षांबद्दल अलीकडील मुलाखतीत मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. तिचा पहिला चित्रपट ‘रहना है तेरे दिल में’ आज कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो, मात्र रिलीजच्या वेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता.
दिया मिर्जाने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीला तिचे अनेक मोठे चित्रपट सलग फ्लॉप ठरले. त्यामुळे इंडस्ट्रीत तिला ‘पनौती’ असेही म्हटले जाऊ लागले होते. ज्या निर्माते-दिग्दर्शकांनी तिला साइन करण्यासाठी रांग लावली होती, तेच लोक अचानक तिच्यापासून दूर गेले असे तिने सांगितले.
पुढे ती म्हणाली, तिची तुलना अनेकदा ऐश्वर्या राय सोबत केली जात होती. याच काळात, वयाच्या 24व्या वर्षी तिने आपल्या वडिलांना गमावले. या वैयक्तिक दुःखासोबतच करिअरमधील चढ-उतारांमुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. त्यामुळे काही काळासाठी तिने कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. ती प्रामाणिकपणे मेहनत करत असूनही यश मिळत नसल्याची भावना तिच्या मनात होती.
ब्रेकनंतर तिने प्रोडक्शन क्षेत्रात पाऊल टाकले आणि लव ब्रेकअप्स जिंदगी तसेच बॉबी जासूस यांसारखे चित्रपट निर्माण केले. मात्र, तिच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट राजकुमार हिरानी यांच्या ‘संजू’ या चित्रपटामुळे आला.
या चित्रपटामुळे ती पुन्हा इंडस्ट्रीत
‘संजू’च्या कास्टिंगदरम्यान तिने स्वतःहून राजकुमार हिरानी यांना फोन करून काम मागितले. माझ्याकडे काम नव्हते आणि मी स्ट्रगल करत होते. स्क्रीन टेस्ट द्यायलाही मी तयार होते असे तिने सांगितले. त्यानंतर हिरानी यांनी रणबीर कपूर आणि टीमशी चर्चा करून तिला मान्यता दत्तच्या भूमिकेसाठी निवडले.
दिया या भूमिकेला लाइफसेव्हर मानते, कारण याच चित्रपटामुळे ती पुन्हा इंडस्ट्रीत भक्कमपणे उभी राहिली. ‘संजू’च्या ब्लॉकबस्टर यशाने तिच्या करिअरला नवी दिशा मिळाली. त्यानंतर तिला काफिर या वेब सिरीजची ऑफर मिळाली, जी तिच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरली. अलीकडेच दिया मिर्जा IC 814: द कंधार हाईजैक आणि नादानियां यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये झळकली आहे.
सुरुवातीच्या अपयशातून आणि वैयक्तिक संकटातून बाहेर पडत, दिया मिर्जाने आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये पुन्हा स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
