Neetu Kapoor : माझा थरकाप उडायचा… ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांना कसली भीती वाटत होती ?

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर यांनी पुन्हा शानदार कमबॅक केलं आहे. गेल्या काही काळात त्या बिग बजेट चित्रपटांत दिसल्या तसेच अनेक जाहिरातीतही चमकल्या. पती ऋषि कपूर यांच्या निधनानंतर त्या खचल्या होत्या, अनामिक भीती त्यांच्या मनात होती. त्याबद्दल काय म्हणाल्या नीतू कपूर ? सध्या सर्वत्र फक्त नीतू यांच्याच वक्तव्याची चर्चा...

Neetu Kapoor : माझा थरकाप उडायचा... ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांना कसली भीती वाटत होती ?
नीतू कपूर
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 12:04 PM

कपूर खानदार हे बॉलिवूडमध्ये कित्येक पिढ्यांपासून कार्यरत आहे. त्यांच्या कुटुंबाची ख्याती फक्त भारतपुरतीच मर्यादित नसून जगभरात त्यांचे लाखो चाहते आहेत. काही वर्षापूर्वीच प्रख्यात अभिनेते ऋषि कपूर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण कपूर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मृत्यूमुळे पत्नी नीतू कपूर या तर पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या आणि अनेक वेळा त्या भावूक झालेल्या दिसल्या. मात्र काही काळाने स्वत:ला सावरून नीतू यांनी बॉलिवूडमध्ये पुन्हा कमबॅक केलं. पण तो काळ किती कठीण होता, त्यावेळी डोक्यात काय काय सुरू होतं, मोठ्या काळाने बॉलिवूडमध्ये पुन्हा काम करताना किती संघर्ष केला याबद्दल नीतू कपूस स्पष्टपणे बोलल्या.

का करायचं नव्हतं कमबॅक ?

ऋषि कपूर हयात असताना नीतू यांनी फारशा चित्रपटांत काम केलं नाही. गेल्या दोन दशकांत ते अवघ्या 1-2 चित्रपटांत एकत्र दिसले. ऋषि कपूर यांच्याशी लगन् झाल्यानंतरच नीतू यांनी काम कमी केलं होतं. 1983मधील जाने जान चित्रपटानंतर त्यांनी काम करणं थांबवलं आणि लाइमलाइटपासूनही दूर गेल्या. पण काही वर्षांपूर्वी ऋषि कपूर यांचं निधन झालं आणि नीतू यांनी पुनहा कमबॅक केलं. मला हे कमबॅक करायचंच नव्हतं,असं त्यांनी सांगितलं. त्यामागचं कारण म्हणजे, पुन्हा चित्रपटात काम केल्यावर ट्रोलिंगचा सामना तर करावा लागणार नाही ना अशी भीती त्यांच्या मनात होती. ट्रोलिंगच्या भीतीने कॅमेरा फेस करण्याची हिंमतच गोला करता येत नव्हती,असे नीतू कपूर म्हणाल्या.

दशकभरानंतर पुन्हा केलं काम

पण ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या, निराशही झाल्या. तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांनी, रिद्धीमा आणि रणबीर यांनी तिला साथ दिली आणि तिला चित्रपटात परतण्याचा सल्ला दिला. एका कार्यक्रमात नीतू आणि त्यांची मुलगी रिद्धीमा एकत्र आल्या होत्या, तेव्हा त्या या विषयावर बोलल्या. ऋषि कपूर यांच्या निधनानंतर पुन्हा काम करण्यास मी तयार नव्हते, ट्रोल्स कसे बोलतात, टीका करतात हे तर सर्वांनाचा माहीत आहे. पण रिद्धीमा आणि रणबीरने मला प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मी एक शो केला आणि जाहिरातीतही काम केलं. ते माझ्यासाठी इतकं सोप्पं नव्हतं. कॅमेऱ्यासमोर उभ राहताचं माझा थरकाप उडायचा, पण आता अशी परिस्थिती नाही. आता मला असं वाटतं की मी घरात बसले तर वेड लागेल.

या प्रोजेक्ट्समध्ये केलं काम

नीतू कपूर यांना वयाच्या 8 व्या वर्षापासूनच चित्रपटात काम करायला सुरूवात केली. त्यांनी 1966 मध्ये सूरज या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांनी दो कलियां, यादों की बारात, खेल खेल में, दीवार, कभी कभी, महा चोर, परवरिश, हिरालाल पन्नालाल, दो दुनिया चार आणि बेशरम या चित्रपटांमध्ये काम केले. लग्नानंतर ब्रेक घेतला. पण नंतर पुन्हा काम सुरू केलं. 2013 मध्ये बेशरम या चित्रपटानंतर नीतू यांनी कोणताही चित्रपट केला नाही. अखेर 2022 मध्ये त्यांनी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले . त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर आता त्या ‘लेटर्स टू मिस्टर खन्ना’मध्ये दिसणार आहेत.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.