AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्या पत्नीचा फोटो अखेर समोर, 4 महिन्यांनंतर फोटो पाहून म्हणाल…

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पूर्णपणे कोलडलेल्या पहिल्या पत्नीचा फोटो अखेर समोर...., निधनाच्या 4 महिन्यांनंतर प्रकाश कौर यांचा फोटो पाहून म्हणाल..., सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय प्रकाश कौर यांचा फोटो...

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्या पत्नीचा फोटो अखेर समोर, 4 महिन्यांनंतर फोटो पाहून म्हणाल...
अभिनेते धर्मेंद्र
| Updated on: Mar 24, 2026 | 12:07 PM
Share

बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूड विश्वात मोठी शोककळा पसरली… धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चाहत्यांना धक्का बसला, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला… 24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनापूर्वी धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालायात उपचार सुरु होते. उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि पुढील उपचार घरीच सुरु करण्यात आले… पण उपचारा दरम्यानच धर्मेंद्र यांचं निधन झाले… धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले. धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. पण धर्मेंद्र यांच्या निधनाच्या चार महिन्यांनंतर पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांचा फोटो समोर आला आहे… सध्या सर्वत्र प्रकार कौर यांच्या फोटोची चर्चा सुरु आहे.

अभिनेता सनी देओल याने आईसोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे… फोटोमध्ये दोघे एकत्र दिसत असून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य देखील आहे. सांगायचं झालं तर, ‘लाहोर 1947’ सिनेमामुळे चर्चेत असताना सनी याने आईसोबत फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये ‘आई…’ असं लिहित अनेक हार्ट इमोजी देखील लावले आहेत. सनी याच्या फोटोवर भाऊ आणि अभिनेता बॉबी देओल याने देखील हार्ट इमोजीसह केमेंट केली आहे. बॉबी याच्या सोबतच अभिनेते अनुपम खेर, राहुल देव, पॉपी जब्बा यांनी देखील फोटोंवर कमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

धर्मेंद्र आणि त्यांची दोन लग्न

धर्मेंद्र यांंनी वयाच्या 19 व्या वर्षी पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी दोन मुलं आणि दोन मुलींचं जगात स्वागत केलं. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यामध्ये प्रेम बहरलं. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम देखील केलं…धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालंय आणि त्यांना चार मुलं देखील आहेत… कळल्यानंतर सुद्धा हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर पहिल्या पत्नीला फार वेदना झाल्या, ‘मी हेमा मालिनी यांच्या जागी असती, तर एखाद्या महिलेचं घर कधीच उद्ध्वस्त केलं नसतं…’ असं प्रकाश कौर म्हणाल्या होत्या. अशात दुसरी पत्नी म्हणून हेमा मालिनी यांना आयुष्यात अनेकदा तडजोड करावी लागली. आता हेमा मालिनी त्यांच्या दोन मुलींसोबत आनंदाने आयुष्य जगत आहेत.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...