Aardhya Bachchan : आराध्या बच्चन सोशल मीडियावर कोणत्या नावाने ? ऐश्वर्या रायने थेट सांगितलं…
ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची लाडकी लेक आराध्या बच्चन या दोघीही नेहमी चर्चेत असतात. ऐश्वर्या कामासाठी बऱ्याचदा परदेशात जाताना आराध्यासोबत स्पॉट होते. चाहत्यांनाही त्या दोघींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. ऐश्वर्या तर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते, बऱ्याच पोस्टही ती टाकत असते. पण तिची लेक आराध्या, सोशल मीडियावर कोणत्या नावाने आहे ?

बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) नेहमी स्पॉटलाइटमध्ये असते. तिच्याप्रमामेच लाडकी लेक आराध्या बच्चन (Aardhya Bachchan)हिची खूप चर्चा होत असते. चाहते हे ऐश्वर्या- आराध्याचे अपडेट्स जाणून घेण्यासही उत्सुक असतात. या दोघी मायलेकी कधी एअरपोर्ट वर कधी फंक्शनमध्ये स्पॉट होतात, त्यांचे फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ऐश्वर्या राय ही नुकतीच रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली होती. तिथे तिने सोशल मीडिया वापराचे फायदे आणि तोटे दोन्ही सांगितलं, त्यावर ती भरभरून बोलली. त्याच वेळी ऐश्वर्याने आराध्याच्या सोशल मीडिया अकाऊंटबद्दल मोठा खुलासाही केला.
ऐश्वर्याने आराध्या बच्चन हिच्या फेक सोशल मीडिया अकाऊंटबद्दल सांगितलं. तिच्या नावाने असलेलं अकाऊं पूर्णपणे फेक आबे, असं सांगत ऐश्वर्याने तिच्या हितचिंतकांचे आभारही मानले.
सोशल मीडिया वर नाही आराध्याचं अकाऊंट
ऐश्वर्याने आपली लेक आराध्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याच्या सर्व अफवांना अगदी पूर्णविराम दिला. आराध्याच्या नावावरील सोशल मीडिया अकाउंट ही तिच्या कुटुंबाकडून मॅनेज केली जात नाहीत असही तिने सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, “कधीकधी लोक असे गृहीत धरतात की बाहेर पडणाऱ्या, समोर येणाऱ्या गोष्टी तिच्या (आराध्याच्या) आहेत. पण नाही, तसं अजिबातच नाही. कदाचित एखाद्या हितचिंतकाने (आराध्याची) ही अकाउंट्स तयार केली असतील.अर्थात, ते आराध्या, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या पतीसाठी आणि माझ्यासाठी लोकाचं जे प्रेम आहे, त्यातूनच येतं. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद, पण ती (आराध्या) सोशल मीडियावर नाही” असं ऐश्वर्याने थेट स्पष्ट केलं.
सोशल मीडियापासून रहा दूर
सोशल मीडियाबद्द बोलताना ऐश्वर्या राय म्हणाली की मी त्यावर खूपच कमी सक्रिय असते आणि ती फक्त व्यावसायिक कारणांसाठीच त्याचा वापर करते. डिजीटल प्लॅटफॉर्मचे फायदे बरेच आहेत, पण त्यात यअनेक आव्हानंही आहेत. सोशल मीडिया हाँ जीवनाचा एक भाग आहे, लोकांशी कनेक्टेड राहण्यासाठी आणि प्रोफेशनल अपडेट्स शेअर करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, असं ऐश्वर्या म्हणाली. पण सोशल मीडियापेक्षा खऱ्या आयुष्यात जे अनुभव येतात, त्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्यातून (सोशल मीडिया) बाहेर पडलं पाहिदे आणि स्वत:ला डिटॉक्स केलं पाहिजे, असंही ऐश्वर्याने नमूद केलं.
