आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyaashree Mote) हिने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कारण भाग्यश्रीने तिच्या प्रियकरासोबतचा हा खास फोटो पोस्ट केला आहे.

1 / 10
मेकअप डिझायनर विजय पलांडेला ती डेट करत असून दोघांनी सोशल मीडियावर नात्याची कबुली दिली आहे.
2 / 10
विजयनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भाग्यश्रीसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.
3 / 10
भाग्यश्री मराठी, हिंदी मालिकांमध्ये आणि दाक्षिणात्य कलाविश्वातही काम केलं आहे.
4 / 10
देवों के देव महादेव, सिया के राम यांसारख्या ऐतिहासिक मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.
5 / 10
देवयानी ही भाग्यश्रीची पहिली मराठी मालिका होती. तर शोधू कुठे या मराठी चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. भाग्यश्रीने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली.
6 / 10
तिचा रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडत असते हे मात्र नक्की.
7 / 10
भाग्यश्रीने 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केलं.
8 / 10
भाग्यश्रीने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे नवे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
9 / 10
भाग्यश्रीचे इन्स्टाग्रामवर चार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.