AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अटक होण्याच्या भीतीने आरोपी करत होता असं काम, तपासात धक्कादायक माहिती समोर

Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्या केल्यानंतर घाबरलेला आरोप करत होतं असं काम? पोलीस तपासात मोठी माहिती समोर... आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. आता त्याला कोर्टात दाखल करण्यात येणार आहे...

अटक होण्याच्या भीतीने आरोपी करत होता असं काम, तपासात धक्कादायक माहिती समोर
saif ali khan Attacker
| Updated on: Jan 19, 2025 | 12:17 PM
Share

अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे स्थित घरात घुसून हत्या करणाऱ्या हल्लेखोराला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. तीन दिवसांनंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. शनिवारी रात्री ठाणे येथून पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद अलीयान उर्फ ​​विजय दास (बीजे) याला ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटजवळील लेबर कॅम्पजवळील झुडपातून पकडले. आरोपी पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचा देखील पोलिसांना संशय आहे. हल्लेखोराने चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसखोरी केली होती.

अटक केल्यानंतर आरोपील कोर्टात हजर करणार असून, पोलीस कस्टडीची मागणी करण्यात येणार आहे. आरोपीबद्दल सांगायचं झालं तर, त्याने पूर्वी ठाण्याच्या एका बारमध्ये काम केलं आहे. शिवाय आरोपी हाऊसकिपिंगच्या एजन्सीत काम करत असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने ओळख पटू नये म्हणून पोलिसांना स्वतःची अनेक खोटी नावं सांगितल्याचं देखील कळत आहे. ज्यामध्ये बिजॉय दास, विजय दास, मोहम्मद इलियास, मोहम्मद सज्जाद, बी.जे. यांसारख्या नावांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेला आरोपी भारतीय आहे की मुंबईत बेकायदेशीरपणे राहणारा बांगलादेशी आहे, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार आरोपी गेल्या पाच महिन्यांपासून मुंबई आणि ठाण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये राहत आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी एका कंस्ट्रक्शन साईटवर काम करत असल्याची माहिती समोर आली. सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी सतत न्यूज चॅनल पाहत होता.

एवढंच नाही तर, आरोपी सतत स्वतःचे लोकेशन देखील बदलत होता. अटक होण्याच्या भीतीने त्याने आपला फोनही बंद केला होता. मात्र, आरोपीकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा अन्य कोणतेही कागदपत्र सापडले नाहीत, ज्यामुळे त्याच्या नावाची किंवा पत्त्याची पुष्टी होऊ शकेल. त्यामुळेच तो बांगलादेशचा रहिवासी असल्याचाही पोलिसांना संशय आहे. आता पुढील पोलीस तपासात काय समोर येईल…  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

१९ डिसेंबरनंतर मराठी माणूस PM होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
१९ डिसेंबरनंतर मराठी माणूस PM होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.