AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elvish Yadav : ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवला धमकी; मागितली इतक्या रुपयांची खंडणी

प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने 'बिग बॉस ओटीटी 2'चं विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर त्याच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली. एल्विशला नुकताच धमकीचा फोन आला. त्याच्याकडे खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

Elvish Yadav : 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादवला धमकी; मागितली इतक्या रुपयांची खंडणी
Elvish Yadav
| Updated on: Oct 26, 2023 | 10:24 AM
Share

गुरुग्राम : 26 ऑक्टोबर 2023 | ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवला अज्ञात लोकांनी कॉल करून त्याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. यानंतर एल्विशने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. धमकीचा हा फोन कोणी केला किंवा कोणाकडून करवण्यात आला, याबद्दल काहीच माहिती नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. 25 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. वजीराबाद गावातून जात असताना एल्विशला एक कॉल आला. कॉलरने त्याला धमकी देत एक कोटी रुपयांची मागणी केली. याप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता बनण्याआधीपासून एल्विश यादव हा युट्यूबवर लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. याच कारणामुळे तो बिग बॉस ओटीटीचा विजेता ठरला. विजेतेपद जिंकल्यानंतर त्याच्यावर मोठमोठ्या ऑफर्सचा वर्षाव झाला. युट्यूबवर एल्विशचे व्लॉग्स खूप लोकप्रिय आहेत. त्याला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळतात. 2016 मध्ये एल्विशने युट्यूब चॅनल सुरू केलं. त्यावर तो विविध व्हिडीओ पोस्ट करत राहिला. पाहता पाहता तो प्रसिद्ध युट्यूबर बनला आणि आज तो कोट्यवधींचा मालक आहे. त्याच्याकडे आलिशान आणि अत्यंत महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.

विशेष म्हणजे एल्विश यादव हा ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये सुरुवातीपासून नव्हता. चार आठवडे झाल्यानंतर वाइल्ड कार्डद्वारे त्याने प्रवेश केला होता. पहिल्याच दिवशी त्याची बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांशी चांगली मैत्री झाली. एल्विश हा बिग बॉसच्या इतिहासातील असा पहिलाच स्पर्धक आहे, जो वाइल्ड कार्डद्वारे येऊन विजेता ठरला.

वाइल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेणारा एल्विश जवळपास 50 दिवसांपेक्षा अधिक काळ तिथे टिकून राहिला. याआधी वाइल्ड कार्डद्वारे आलेला कोणताच स्पर्धक विजेता ठरला नव्हता. एल्विशने प्रसिद्ध युट्यूबर अभिषेक मल्हान, अभिनेत्री पूजा भट्ट, मनीषा राणी, बेबिका धुर्वे यांना हरवलं. बिग बॉसची ट्रॉफी आणि 25 लाखांचं रोख बक्षीस त्याने आपल्या नावे केलं. एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान या दोघांमध्ये ‘कांटे की कट्टर’ होती. त्यांना मिळालेल्या मतांमध्ये फार कमी फरक होता. एल्विश यादवला फिनालेमध्ये 54 टक्के मतं मिळाली तर अभिषेकला 46 टक्के मतं मिळाली होती. म्हणजेच फक्त आठ टक्क्यांच्या फरकाने एल्विश हा शो जिंकला होता.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.