सलमान खानने थेट डोनाल्ड ट्रम्पवर साधला निशाणा, शांतता करारावरही टीका करत भाईजान म्हणाला..
Salman Khan: 'जे संपूर्ण जगात अडचण निर्माण करत आहेत, त्यांनाच...', सलमान खान याने थेट डोनाल्ड ट्रम्पवर साधला निशाणा, व्हिडीओ तुफान व्हायरल, सध्या सर्वत्र सलमान खान याच्या वक्तव्याची चर्चा...

Salman Khan: ‘बिग बॉस 19’ शोच्या नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेका सलमान खान याने थेट घरातील भांडणांवर हल्लाबोल केला आणि स्पर्धकांवर देखील टीका केली. यावेळी सलमान खान याने अशा स्पर्धकांवर टीका केली जे शांतता ठेवण्याचा दावा तर करतात. पण तेच वादाला तोंड फोडतात… दरम्यान, स्पर्धकांना सुनावताना सलमान खान याने असं वक्तव्य केलं, जे अमेरिकेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अभिनेत्याने अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्या सारखं होतं… असं अनेकांचं म्हणणं आहे.
सलमान खान म्हणाला, ‘संपूर्ण जगात हे काय होत आहे. जो सर्वात जास्त अडचणी निर्माण करत आहे. त्यालाच शांती पुरस्कार हवा आहे…’, भाईजानच्या या एक वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील व्हिडीओ तुफाम व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, एका एपिसोडमध्ये सलमान खान याने फरहाना भट्ट हिला चांगलंच सुनावलं. एवढंच नाही तर, फरहाना हिच्या ‘शांतता कार्यकर्त्या’ ची प्रतिमेवर देखील अभिनेत्याने निशाणा साधला. ‘फरहाना, कोणत्या बाजून तू स्वतः पीस एक्टिविस्ट म्हणतेस? तुझा अहंकार इतका मोठा आहे, की तू स्वतःला कोण समजतेस? ‘2 कौडी की…’ निलमसाठी हे शब्द योग्य आहेत? आणि एका महिलेबद्दल तू असं कसं बोलू शकतेस?’
View this post on Instagram
फरहानाच्या नावाने सलमानने ट्रम्पवर निशाणा साधला!
सुरुवातीला नीलम गिरी आणि झीशान कादरी यांच्यात वाद झाला होता, परंतु फरहानाने मध्ये उडी मारली आणि नीलमवर संताप व्यक्त केला, तेव्हा प्रकरण वाढलं. तिने नीलमला ‘दोन कौडी की औरत’ आणि ‘कुनिका की चमची’ असं म्हटलं. फरहानाच्या या घाणेरड्या कमेंटनंतर नीलम रडू लागली आणि गप्प बसत नव्हती.
अनेकांनी केलं सलमान खान याचं कौतुक
सलमानने ट्रम्पवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ शनिवारी आणि रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि सलमानच्या हुशारीचं अनेकांनी कौतुक केलं. एक्सवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘सलमान खान न्यूज पाहतो… याचा मला अंदाज देखील नव्हता… ‘
सलमान खान याचा व्हिडीओ रेडिटवर या कॅप्शनसह शेअर करण्यात आला होता – सलमान भाई बिग बॉसमध्ये ट्रम्पवर टीका करत आहे. या पोस्टवर एका कमेंटमध्ये लिहिले होते – हे भाईचे अद्भुत काम आहे. दुसऱ्याने लिहिलं – ट्रम्पच्या उत्तराची वाट पाहत आहे, हाहा. सध्या सर्वत्र सलमान खान याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
