AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Armaan Kohli arrest : अभिनेता अरमान कोहलीला अटक, ड्रग्जप्रकरणात NCB ची मोठी कारवाई

अरमान कोहलीच्या घरावर रोलिंग थंडर ऑपरेशन अंतर्गत छापा टाकण्यात आला. त्यातच त्याला ताब्यात घेण्यात आलं. एवढंच नाही तर आणखी काही मोठी नावे यात सामील होण्याची चिन्ह आहेत. (Armaan Kohli: Actor Armaan Kohli's troubles escalate, NCB arrests under the operation 'Rolling Thunder')

Armaan Kohli arrest : अभिनेता अरमान कोहलीला अटक, ड्रग्जप्रकरणात NCB ची मोठी कारवाई
| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 10:49 AM
Share

मुंबई : बिग बॉसचा फेम (Bigg Boss) अभिनेता अरमान कोहली (Armaan Kohli) पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. ड्रग्ज प्रकरणी शनिवारी अरमानच्या घरावर छापा टाकल्यानंतर एनसीबीला कोहलीच्या घरी ड्रग्स सापडले आहे.आता नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनं त्याला अटक केली आहे.

NCB ला गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ड्रग्जबद्दल बरीच माहिती मिळाली होती, त्यानंतर NCB नं एक ऑपरेशन सुरू केलं आणि त्याला रोलिंग थंडर असं नाव दिलं. अरमान कोहलीच्या घरावर रोलिंग थंडर ऑपरेशन अंतर्गत छापा टाकण्यात आला. त्यातच त्याला ताब्यात घेण्यात आलं. एवढंच नाही तर आणखी काही मोठी नावे यात सामील होण्याची चिन्ह आहेत.

अरमानकडे सापडलं अमेरिकन कोकेन

NCBनं अरमानच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्याच्याकडे ‘अमेरिकन कोकेन’ सापडलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे ‘अमेरिकन कोकेन’ विशेष आणि महागड असतं त्यामुळे हे अरमानकडे आलं कसं याबद्दल आता तपास सुरू करण्यात आला आहे. आता ड्रग्स तस्करांची कोणती गॅंग यात सहभागी आहे, हे ड्रग्स कसं आणलं जातं हे शोधण्यावर आता एनसीबीचा भर असणार आहे.

ड्रग्स पेडलर्सकडून मिळाली माहिती

मागील काही दिवसांपासून NCB ने ड्रग्स तस्करीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत कालपासून मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली जात आहे. या कारवाईमध्ये NCB च्या अधिकाऱ्यांनी 15 पेक्षा अधिक ड्रग्स पेडलर्सना अटक केली आहे. NCB चे अधिकारी या ड्रग्स तस्करांची चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान ड्रग्स तस्करीमध्ये अभिनेता अरमान कोहलीचा समावेश असल्याची माहिती NCB ला मिळाली. त्यानंतर याच माहितीच्या आधारे एनसीबीने आज अरमान कोहलीच्या घरावर छापेमारी केली. या कारवाईत एनसीबीला अरमानच्या घरी ड्रग्स सापडले आहे. हे ड्रग्स किती आहे ? त्याची बाजारमूल्यानुसार काय किंमत आहे ? याची माहिती मिळू शकलेली नाही.

कोण आहे अरमान कोहली?

अरमान कोहली हा ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार कोहली आणि ज्येष्ठ अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे. ‘बदले की आग’ आणि ‘राज तिलक’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून अरमानने सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. हे दोन्ही सिनेमे त्याच्या वडिलांनी म्हणजे राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केले होते.

विरोधी, दुश्मन जमाना, औलाद के दुश्मन, वीर, कहर, जानी दुश्मन यांसारख्या सिनेमात अरमानने काम केलेले आहे. त्यानंतर मध्ये 12 वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमातही तो दिसला होता. 2013 सालच्या बिग बॉसच्या सीझनमध्येही अरमान सहभागी झाला होता. जानी दुश्मन या चित्रपटातही त्याने काम केलेले आहे.

संबंधित बातम्या

अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर NCB चा छापा, ‘जानी दुश्मन’साठी ऑपरेशन ‘रोलिंग थंडर’

Bigg Boss OTT : शमिता शेट्टी राकेशला म्हणाली – इथे ये आणि आता मला किस कर, पाहा पुढे काय झालं…

Sushant Video : ‘एमएस धोनी’ चित्रपटाच्या तयारीदरम्यान कॅप्टन कूलला त्रास द्यायचा सुशांत, पाहा व्हिडीओ

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.