Dilip Kumar | नाशिकशी दिलीप कुमारांचं खास कनेक्शन, याच ठिकाणी त्यांच्या आई-वडिलांची कबर!

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे मुंबईत निधन झाले आहे. दिलीप कुमार यांचे बालपण आणि  तरुणपण देखील नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात व्यतीत झाले आहे. त्यांच्या आई-वडिलांची आणि मोठ्या भावाची कबर देखील याच ठिकाणी देवळाली कॅम्पच्या कब्रस्तानमध्ये आहे.

Dilip Kumar | नाशिकशी दिलीप कुमारांचं खास कनेक्शन, याच ठिकाणी त्यांच्या आई-वडिलांची कबर!
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 1:42 PM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे मुंबईत निधन झाले आहे. दिलीप कुमार यांचे बालपण आणि  तरुणपण देखील नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात व्यतीत झाले आहे. त्यांच्या आई-वडिलांची आणि मोठ्या भावाची कबर देखील याच ठिकाणी देवळाली कॅम्पच्या कब्रस्तानमध्ये आहे. आपल्या आई-वडिलांच्या शेजारी आपलंही दफन व्हावं, अशी दिलीप कुमार यांची इच्छा होती असे इथले कर्मचारी सांगतात. नाशिकमध्ये बालपण गेल्यामुळे नाशिकशी त्यांचे घनिष्ट संबंध होते (Dilip Kumar’s special connection with Nashik, the grave of his parents at this place).

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील.

मलाही आई-वडिलांच्या शेजारी दफन करा!

दिलीप कुमार यांच्या वडिलांच्या नाशिकमध्ये फळबागा होत्या. यामूळ एत्यांच्या आयुष्याचा अधिक काळ हा नाशिकमध्येच गेला. काही काळानंतर ते मुंबईत आले. मात्र, त्याच्या आई-वडिलांच्या मृत्युनंतर त्यांना नाशिकच्या देवळाली परिसरातील कब्रस्तानातच दफन करण्यात आले आहे. आई-वडिलांच्या शेजारीच त्यांच्या मोठ्या भावाची कबर देखील आहे.

दिलीप कुमार जेव्हा नाशिकमध्ये येत तेव्हा या ठिकाणी जाऊन आपल्या आई-वडील आणि भावाच्या कबरींवर फुलं वाहत, चादर चढवत. यानंतर ते येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असत. याचवेळी त्यांनी आपल्या मृत्युनंतर आपल्यालाही तेथील रिकाम्या जागेत दफन करण्यात यावं, अशी इच्छा बोलून दाखवल्याचे येतील कर्मचारी सांगतात. मात्र, असे कुठेच लिखित स्वरुपात नसल्याने त्यांचे दफन विधी मुंबईतील सांताक्रूझ परिसरात पार पडणार आहेत.

दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पेशावर येथे झाला होता. त्यावेळी हा प्रदेश भारतात होता. दिलीपकुमार यांची एकूण 12 भावंडे होती आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही अत्यंत वाईट होती. दिलीप कुमार यांचे वडील कामाच्या शोधात पेशावरहून मुंबईला आले होते. मात्र, मुंबईत काम नसल्याने आणि कुटूंबियांशी झालेल्या वादामुळे दिलीपकुमार पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात ते ब्रिटीश आर्मीच्या कॅन्टीनमध्ये सहाय्यक म्हणून काम करायचे. या नोकरीसाठी त्यांना महिन्याकाठी पगार म्हणून फक्त 36 रुपये मिळायचे.

सँडविच विकण्यास केली सुरुवात

65हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दिलीप कुमार यांनी या कॅन्टीनमध्ये काम करत असताना आपले सँडविच काउंटर उघडले. त्यांचे सँडविच ब्रिटीश सैनिकांमध्ये खूप लोकप्रिय होते. तथापि, या कामादरम्यान त्यांनी ब्रिटीश सैनिकांसमोर भारताच्या स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती, त्यानंतर त्यांचे काम थांबले आणि त्यांना तुरुंगात जावे लागले. सुटकेनंतर ते मुंबईत आले आणि आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली. दिलीपकुमार यांनीही उशी विक्रीचे कामही केले होते, पण तेही यशस्वी झाले नाही.

(Dilip Kumar’s special connection with Nashik, the grave of his parents at this place)

हेही वाचा :

Dilip Kumar :चित्रपटांचा बेताब बादशाह, फळांची विक्रीही केली, असा राहिला शेती-मातीशी संबंध

Dilip Kumar Top 5 Films : ‘नया दौर’पासून ‘राम और शाम’पर्यंत, दिलीप कुमारांचे सुपरहिट चित्रपट आजही लोकप्रिय!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.