अजय देवगणच्या उपस्थितीत मेटावर्समध्ये रनवे 34 गेम लाँच, आता डिजीटल कलेक्टेबलची खरेदी करता येणार

अजय देवगण आणि हेफ्टीवर्स यांच्यातील ही दुसरी घोषणा असून यापूर्वी कधीही न पाहिलेल्या मेटावर्स अवतारात अभिनेत्याला पाहण्याची संधी मिळणार आहे. मार्च महिन्याच्या पूर्वार्धात, या सुपरहिरोने या दुनियेत प्रवेश केला, त्याची व्यक्तिरेखा ओटीटी सिरीज ‘रुद्रा – द एज ऑफ डार्कनेस’ने प्रेरीत असून वापरकर्त्याला गुंतवून ठेवणारा मनोरंजक अनुभव देईल.

अजय देवगणच्या उपस्थितीत मेटावर्समध्ये रनवे 34 गेम लाँच, आता डिजीटल कलेक्टेबलची खरेदी करता येणार
Image Credit source: TV9
आयेशा सय्यद

|

Apr 23, 2022 | 4:58 PM

मुंबई : हेफ्टीवर्स हंगामाचा वेब 3.0 उपक्रम मेटावर्समधील पुढचे मोठे पाऊल उचलण्यासाठी सज्ज आहे. फर्स्ट-मूव्ह कॅटेगरीत हा ब्रँड बॉलिवूडमधील बड्या सुपरस्टार सोबत अजय देवगणसोबत (Ajay Devgan) मेटावर्समध्ये रनवे 34 गेम लॉन्च करण्यासाठी एकत्र आला. या खेळाची संकल्पना 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चित सिनेमावर आधारित असून या खेळाच्या लॉन्चप्रसंगी सर्वांच्या पसंतीचा अभिनेता तसेच हंगामा आणि हेफ्टीवर्सचे संस्थापक नीरज रॉय (Neeraj Roy) उपस्थित होते.

अजय देवगण आणि हेफ्टीवर्स यांच्यातील ही दुसरी घोषणा असून यापूर्वी कधीही न पाहिलेल्या मेटावर्स अवतारात अभिनेत्याला पाहण्याची संधी मिळणार आहे. मार्च महिन्याच्या पूर्वार्धात, या सुपरहिरोने या दुनियेत प्रवेश केला, त्याची व्यक्तिरेखा ओटीटी सिरीज ‘रुद्रा – द एज ऑफ डार्कनेस’ने प्रेरीत असून वापरकर्त्याला गुंतवून ठेवणारा मनोरंजक अनुभव देईल.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

HeftyVerse.xyz वर उपलब्ध असणाऱ्या या खेळात, वापरकर्त्याला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा आणि उत्साही अनुभव मिळणार आहे. सिनेमा विश्वातील दिग्गज आणि गेमर्स एकत्र आणत, वापरकर्ते, अजयचे सहकारी असतील. त्यांना आपतकालीन स्थितीत सुरक्षित लॅंडींगचा प्रयत्न करावा लागेल. हातातून वेळ निसटत असताना, अजय देवगणची व्यक्तिरेखा, कॅप्टन विक्रांत खन्ना खेळाडूना सर्व सूचना देईल. रनवे खेळात अनेक कठीण आव्हाने आणि लेव्हल आहेत. ज्या अजिबात सोप्या नाहीत. सिनेमातील वेगात घडणारी धांदल खेळाचा भाग असणार आहे. या खेळासोबतच सिनेमातील अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंगच्या व्यक्तिरेखांचे डिजीटल कलेक्टीबल एनएफटीवर उपलब्ध असतील. आगामी काळात अशातऱ्हेचे अनेक रोचक गमतींची मजा अनुभवता येईल. अजय देवगण फिल्म्स एजन्सी पार्टनर, TheSmallBigIdea सोबत दीर्घकालीन भागीदारीचा हेफ्टीवर्सला आनंद आहे.

या भागीदारीविषयी बोलताना हंगामा आणि हेफ्टीवर्सचे संस्थापक नीरज रॉय म्हणाले, “इंटरनेटच्या दुनियेत मेटावर्स नवीन नेतृत्व घेऊन आली आहे. प्रेक्षक आणि चाहत्यांना गुंतवून ठेवणारं हे मनोरंजनपर माध्यम म्हटलं पाहिजे. भारतीय सिने उद्योगासाठी हे मोठे वरदान ठरलं आहे. आम्ही अनुभव करू पाहणाऱ्या सिनेमाची पद्धत नक्कीच बदलेल. अजय देवगण हा या उद्योगातील विश्वासाला पात्र ठरलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ज्याच्या सिनेमांची जगभर प्रतीक्षा असते. चाहते एनएफटी खेळाची मजा घेतील, हा खेळ अतिशय गुंतवून ठेवणारा, खेळण्यासाठी तसेच खरेदीकरिता अनेक डिजीटल कलेक्टीबल उपलब्ध करून देणारा आहे.”

या घोषणेविषयी आपले विचार मांडताना अभिनेता अजय देवगण म्हणाला, “मेटावर्सवर हंगामा सोबत परतताना आनंद होतोय! निश्चित वेळेवर एखादी गोष्ट स्वीकारणं महत्त्वपूर्ण ठरतं तसेच मावळणाऱ्या प्रत्येक दिवसासह लोकप्रियता वाढणाऱ्या माध्यमावर चमकणं काळाची गरज आहे. रनवे 34 मध्ये जबरदस्त पकड आहे. त्यात अविरत रहस्य भरलं आहे. प्रत्येकवेळी खेळ खेळताना मी देखील सारख्याच उत्साहाचा अनुभव घेतला. जगभरातील प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा आणि वास्तविक जीवनाचा अनुभव देणाऱ्या भागीदारीत सहभागी होताना मेटावर्समधील माझ्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा माझा प्रयत्न राहील.”

Will Smith In Mumbai : ऑस्कर पुरस्कारामध्ये कानाखाली लगावल्यानंतर विल स्मिथ मुंबई विमातळावर दिसला, सोबत असलेले हे साधू नेमके कोण?

Navneet Rana Films Video: संजय राऊतांच्या ‘C’ ग्रेड अटॅकनंतर नवनीत राणांचे हे चार व्हिडीओ का चर्चेत आहेत ?

Singer Rihanna with Baby Bump: हॉलिवूडची स्टार गायिका रिहाना बेबीबंपसह समुद्र किनाऱ्यावरील फोटो व्हायरल

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें