Kareena Kapoor-Khan | बॉलिवूड करिअरला 21 वर्ष पूर्ण, करीना कपूरने खास video शेअर करत सांगितला पुढचा प्लॅन

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खानने 21 वर्षापूर्वी 'रेफ्यूजी' चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर आजपर्यंत करीनाने तिच्या करिअरमध्ये मागे वळून पाहिले नाही. आता तिच्या 'रीफ्यूजी' या चित्रपटाच्या रिलीजला 21 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, करीनाने पुन्हा एकदा पुढच्या 21 वर्षांच्या आपल्या योजना सांगितल्या.

Kareena Kapoor-Khan | बॉलिवूड करिअरला 21 वर्ष पूर्ण, करीना कपूरने खास video शेअर करत सांगितला पुढचा प्लॅन
करीना कपूर-खान

मुंबई : बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खानने 21 वर्षापूर्वी ‘रेफ्यूजी’ चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर आजपर्यंत करीनाने तिच्या करिअरमध्ये मागे वळून पाहिले नाही. आता तिच्या ‘रीफ्यूजी’ या चित्रपटाच्या रिलीजला 21 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, करीनाने पुन्हा एकदा पुढच्या 21 वर्षांच्या आपल्या योजना सांगितल्या (Kareena Kapoor Khan completes 21 years in Bollywood career).

व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

बुधवारी संध्याकाळी करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या पहिल्या ‘रीफ्यूजी’ या चित्रपटाच्या काही क्लिप्स शेअर केल्या आहेत. या व्हिडीओद्वारे करीना आपल्या इंडस्ट्रीतील दोन दशकांच्या प्रवासाविषयी बोलली आहे. येत्या 21 वर्षांसाठीही आपण तयार असल्याचेही तिने सांगितले आहे.

पाहा व्हिडीओ

चाहत्यांचे मानले आभार

या व्हिडीओमध्ये करीनाने जेपी दत्ता आणि अभिषेक बच्चन यांना टॅग केले आहे. तसेच, तिने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले के, ’21 वर्षे … कृतज्ञ, आनंदी, भाग्यवान, प्रेरणादायक, उत्साही… आणखी 21 वर्ष येणार आहेत… मी तयार आहे. तुमच्या सगळ्या प्रेम आणि समर्थनाबद्दल सर्वांचे आभार.’ या पोस्टमध्ये अभिषेक बच्चनला टॅग करत करीनाने #JPDutt #JPFilms हे हॅशटॅगही वापरले आहेत.

अभिषेक बच्चनसोबत डेब्यू

करीना आणि अभिषेकने ‘रेफ्यूजी’ चित्रपटाद्वारे एकत्र बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट 30 जून 2000 रोजी प्रदर्शित झाला. ज्यामध्ये जेपी दत्ताने कपूर आणि बच्चन या दोन फॅमिलेची स्टार किड्स लाँच केले होते.

‘रेफ्यूजी’ या चित्रपटाने करिअरची सुरुवात करणारी करीना आजच्या घडीला चित्रपटांसाठी भरमसाठ मानधन आकारते. करीना बॉलिवूडमधील महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. एकट्या करीनाकडे 413 कोटींची संपत्ती आहे. यामध्ये पती सैफ अली खानच्या मालमत्तेचा समावेश नाही.

करीना कपूर खानचे बंगले आणि गाड्या

अभिनेत्री करीना कपूरकडे स्वत:च्या कमाईचे लक्झरी बंगले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, वांद्रे येथील फॉर्च्यून हाईट्समध्ये या अभिनेत्रीचा 4BHK अपार्टमेंट आहे. इतकेच नाही तर, तिचे स्वित्झर्लंडच्या Gstaa येथेही घर असल्याचे म्हटले जाते.

करीना कपूर यांना वाहनांची प्रचंड आवड आहे आणि तिच्याकडे बर्‍याच गाड्या देखील आहेत. ज्यात मर्सिडीज बेंझ एस क्लास या गाडीचा समावेश आहे. या मर्सिडीज बेंझ एस-क्लासची किंमत सुमारे 1.40 कोटी रुपये आहे. तर, तिच्याकडे ऑडी क्यू 7 गाडी देखील आहे, जिची किंमत 93 लाख रुपये आहे. या शिवाय तिच्याकडे रेंज रोव्हर स्पोर्ट एसयूव्ही आणि लेक्सस एलएक्स 470 या जवळपास 2.32 कोटी रुपयांच्या गाड्या आहेत.

(Kareena Kapoor Khan completes 21 years in Bollywood career)

हेही वाचा :

PHOTO | छोट्या पडद्यापासून फिल्मी विश्वापर्यंतचा प्रवास, असे होते मंदिरा बेदीचे करिअर!

Mandira Bedi | पतीच्या निधनामुळे कोसळला दुःखाचा डोंगर, मैत्रीण मौनी रॉयने घेतली मंदिराची भेट!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI