83 The Film | रणवीरच्या चित्रपटात चिमुकला सचिन तेंडुलकर? ‘83’च्या ट्रेलरमधील लहान मुलाने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष!

अभिनेता रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) ‘83’ (83 The film) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे .ट्रेलरमध्ये दिसणार्‍या प्रत्येक दृश्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

83 The Film | रणवीरच्या चित्रपटात चिमुकला सचिन तेंडुलकर? ‘83’च्या ट्रेलरमधील लहान मुलाने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष!
83 film

मुंबई : अभिनेता रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) ‘83’ (83 The film) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे .ट्रेलरमध्ये दिसणार्‍या प्रत्येक दृश्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्याशिवाय आणखी एक व्यक्ती ट्रेलरमध्ये लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. या ट्रेलरमध्ये एक लहान मुलगा असून, तो बालपणीचा सचिन तेंडुलकर असल्याचे सांगितले जात आहे.

आता तुम्ही म्हणाल की, 1983 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर टीम इंडियाचा भाग नव्हता. त्यावेळी त्यावेळी तो लहान होता, मग तो ट्रेलरमध्ये कसा दिसणार? 1983 मध्ये जेव्हा टीम इंडियाने भारताचा पहिला विश्वचषक सामना जिंकला, त्यावेळी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने कबूल केले होते की, त्याने टीम इंडियासाठी खेळायला सुरुवात केली नव्हती, पण तो लहानपणापासूनच क्रिकेटचा चाहता होता. सचिन तेंडुलकर 1983 मध्ये 10 वर्षांचा होता. 1983च्या विश्वचषकाच्या विजयानंतर त्याची क्रिकेटची आवड आणखी वाढली.

लहान मुलावर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा!

ट्रेलरमध्ये एक दृश्य आहे, जिथे टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर आजूबाजूचे लोक जल्लोष करताना दिसत आहेत. भारताच्या ऐतिहासिक विजयावर लोक नाचत आहेत, आतषबाजी होत आहे. दरम्यान, एक लहान मुलगा दिसतो. हा मुलगा भारताने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत आहे. ट्रेलरमधील हे दृश्य सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. या मुलाचे केस कुरळे असल्यामुळे त्याला सचिन तेंडुलकर म्हटले जात आहे.

या मुलाला पाहून चाहते या दृश्याचे स्क्रीनशॉट्स ट्विट करत आहेत. ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर याची झलक या ट्रेलरमध्ये दिसल्याचे म्हटले जात आहे. सचिन तेंडुलकरचे हे दृश्य पाहून चाहते खूश झाले आहेत. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला हा मुलगा सचिन तेंडुलकर आहे की, कुणी सामान्य मुलगा, हे संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. पण, सध्या ट्रेलरमध्ये मास्टर बॅलास्टर दाखवण्यात आल्याचे म्हणत चाहत्यांना मात्र भरपूर आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

Video | सारा अली खानची बडदास्त ठेवण्याच्या नादात बॉडीगार्डचा ‘पापाराझी’ला धक्का, पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं…

This Week on OTT | खून, चोरी, दरोडा आणि सस्पेन्सने भरलेला असणार येता आठवडा, पाहा कोणत्या सीरीज-चित्रपट रिलीज होणार?

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात


Published On - 1:56 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI