कपूर खानदानाच्या ‘या’ लेकीने घेतली अत्यंत लग्झरी गाडी, तब्बल 2 कोटी आणि…
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिची बहीण खुशी कपूर ही देखील सध्या चांगलीच चर्चेत आहे. खुशी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे प्रमोशन करतानाही खुशी कपूर ही दिसली होती.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, जान्हवी कपूरच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळत नाहीये. जान्हवी कपूरचा काही दिवसांपूर्वीच उलझ हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, जान्हवी कपूरच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. जान्हवी कपूर हिची बहीण खुशी कपूर हिने देखील बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. विशेष म्हणजे शाहरूख खानची लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि बोनी कपूरची लेक खुशी कपूर यांनी एकाच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.
जान्हवी कपूर हिच्याप्रमाणेच खुशी कपूर देखील चांगलीच चर्चेत दिसत आहे. नुकताच आता खुशी कपूर हिने अत्यंत मोठी खरेदी केलीये. खुशी कपूर हिने मर्सिडीज् बेंज जी 400 डी ही गाडी खरेदी केली आहे. ही गाडी अत्यंत लग्झरी गाडी आहे. हेच नाही तर ही महागड्या गाड्यांपैकी एक नक्कीच आहे. आपल्या नव्या कारसोबत खुशी कपूर नुकताच स्पॉट झालीये.
रिपोर्टनुसार खुशी कपूर हिने ही गाडी जानेवारी महिन्यातच घेतली आहे. या गाडीची किंमत 2.55 कोटी आहे. आतमधूनही गाडी अत्यंत आलिशान आहे. आता खुशी कपूर हिने खरेदी केलेल्या या गाडीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे खुशी कपूर ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. खुशी कपूरचा काही दिवसांपूर्वीच द आर्चीज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
विशेष म्हणजे चाहत्यांना खुशी कपूर हिचा अभिनय आवडला देखील. मात्र, हा चित्रपट फ्लॉप गेला. खुशी कपूर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही खुशी कपूर ही दिसते. खुशी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
खुशी कपूर ही वडील बोनी कपूर आणि बहिण जान्हवी कपूर यांच्यासोबत राहते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामध्ये बहीण जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया याच्यासोबत धमाल करताना खुशी कपूर ही दिसली होती. खुशी कपूरचे ही नेहमीच बहीण जान्हवी कपूर हिच्यासोबत स्पॉट होताना देखील दिसते.
