Border 2: मनात देशभक्ती, अंगावर शहारे..; सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ प्रेक्षकांना कसा वाटला?
Border 2 Twitter Review: सनी देओलचा 'बॉर्डर 2' हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवर अनेकांनी पोस्ट लिहित या चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. प्रेक्षकांनी याला किती स्टार्स दिले, ते पहा..

जे. पी. दत्ता यांच्या सुपरहिट ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा सीक्वेल ‘बॉर्डर 2’ आज (शुक्रवार, 23 जानेवारी) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली होती. त्या जोरावर ‘बॉर्डर 2’ची अॅडव्हान्स बुकिंगसुद्धा दमदार झाली आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये चांगलीच गर्दी केली आहे. ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांनी सोशल मीडियावर त्याबद्दल रिव्ह्यू लिहिण्यास सुरुवात केली आहे. प्रेक्षकांना सनी देओलचा हा चित्रपट कसा वाटला, त्याबद्दल या पोस्टमधून स्पष्ट होतंय.
‘बॉर्डर 2’ची कथा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. 2026 या वर्षातील हा सर्वांत मोठ्या सीक्वेलपैकी एक मानला जात आहे. थिएटरमध्ये चित्रपट पाहिल्यानंतर ‘बॉर्डर 2’ हा 2026 या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट होईल, असा अंदाज प्रेक्षक वर्तवत आहेत. याचाच अर्थ, अनेकांना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे. ट्विटरवर एका युजरने लिहिलं, ‘हाय-ऑक्टेन व्हर्जन, एक सिनेमॅटिक विजय, रेटिंग 4.5/5, खऱ्याखुऱ्या भावना, देशभक्तीच्या फिल्ममेकिंगमध्ये एक मास्टर क्लास, प्रत्येक फ्रेममध्ये सनी देओल जबरदस्त आहे.’ तर दुसऱ्या प्रेक्षकाने लिहिलं, ‘हा केवळ एक चित्रपट नाही तर थिएटरसाठी बनवलेला एक इमोशनल पॅक्ड बॅटलफिल्ड अनुभव आहे.’ अनेकांनी हा चित्रपट आवर्जून पहायला जावा, असा असल्याचं म्हटलंय.
The High Octane Version#Border2Review: A CINEMATIC TRIUMPH 🇮🇳🔥 Rating: ⭐⭐⭐⭐💫 (4.5/5) Pure adrenaline & raw emotion. It is a masterclass in patriotic filmmaking & honors the courage of our soldiers with every frame Sunny returns with unmatched intensity#Border2 #SunnyDeol pic.twitter.com/xvTH38gklE
— LoveAngels🦋 (@lovesangel088) January 22, 2026
Just watched #Border2 🔥REVIEW Rating: ⭐⭐⭐⭐½ / 5#Border2 brings back the soul of patriotic mass cinema with bigger scale, deeper emotions, and thunderous nationalism 🇮🇳 This is not just a film it’s an emotion-packed battlefield experience made for theatres. pic.twitter.com/7YOVaClouU
— suraj (@MRSURAJ1782) January 22, 2026
‘बॉर्डर 2 हा पहिल्या भागापेक्षाही अत्यंत मोठ्या स्केलवर बनवण्यात आला आहे. त्यामुळे दोघांची तुलना करू नका. गदर 2 नंतर सनी पाजीचा जलवा परतला आहे, इतकंच मी म्हणू शकेन. वरुण धवननेही यात चांगलं काम केलंय. मनाला भिडणारं, प्रभावशाली आणि देशभक्तीपूर्ण असा हा चित्रपट आहे’, असं आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
Border2: BRILLIANT 🇮🇳 Rating: ⭐️⭐️⭐️⭐️
Power, patriotism and pride come together in #Border2, a film that fills your heart with national pride while paying a heartfelt tribute to our armed forces. Highly recommended!
Director #AnuragSingh delivers a rousing,… pic.twitter.com/jjxS7ZUZUK
— Kapil Bhargava (@lazykapil) January 22, 2026
‘बॉर्डर 2’मध्ये सनी देओलने लेफ्टनंट कर्नल फतेह सिंह कलेरची भूमिका साकारली आहे. तर वरुण धवन यामध्ये मेजर होशियार सिंह दहिया यांच्या भूमिकेत आहेत. दिलजीत दोसांझने फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखोंची भूमिका साकारली आहे. तर सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी यामध्ये लेफ्टनंट कमांडर जोसेफ पियस अल्फ्रेड नोरोन्हा, एमव्हीसी यांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात मोना सिंह, सोनम बाजवा आणि मेधा राणा यांच्याही भूमिका आहेत.
