Bigg Boss 13 : ‘बिग बॉस 13’मुळे अश्लीलतेचा प्रसार, शो बंद करण्यासाठी केंद्राकडे मागणी

कलर्स चॅनलवर प्रसारित होणाऱ्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस'च्या 13 वा पर्व नुकतंच सुरु झालं आहे (Bigg Boss 13 Ban). मात्र, आता या कार्यक्रमावर बंदी आणण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CIAT) ने या कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

Bigg Boss 13 : ‘बिग बॉस 13’मुळे अश्लीलतेचा प्रसार, शो बंद करण्यासाठी केंद्राकडे मागणी

मुंबई : कलर्स चॅनलवर प्रसारित होणाऱ्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’च्या 13 वा पर्व नुकतंच सुरु झालं आहे (Bigg Boss 13 Ban). मात्र, आता या कार्यक्रमावर बंदी आणण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CIAT) ने या कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

CIAT ने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ‘बिग बॉस 13’ च्या प्रसारणावर बंदी आणण्यात यावी अशी विनंती केली आहे (CIAT letter to Prakash Javdekar). CIAT च्या मते, यंदाच्या पर्वात मोठ्या प्रमाणात अश्लीलतेचा प्रचार केला जात आहे. प्राईम टाईम वेळी हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. त्यामुळे समाजावर याचा वाईट परिणाम होतो आहे.

इतकंच नाही तर ट्विटरवरही अभिनेता सलमान खानच्या या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. ‘बिग बॉस 13’ विरोधात अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘बिग बॉस’ या कार्यक्रमामुळे भारतीय संस्कृती धोक्यात आहे. कार्यक्रमात बेड पार्टनर्स बनवले जात आहेत, त्यामुळे या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. लोक आता या कार्यक्रमावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी करत आहे.

त्यामुळे आता अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला ‘बिग बॉस 13’ कार्यक्रमावर केंद्रीय सरकार काय निर्णय घेणार याकडे सध्या ‘बिग बॉस’ चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

संबंधित बातम्या :

Bigg Boss 13 : BB शब्दातून स्पर्धकांची एंट्री, म्युझियमप्रमाणे दिसणार बिग बॉसचं घर

Bigg Boss-13 : अखेर मुहूर्त ठरला, ‘बिग बॉस’ 13 दिवसात तुमच्या भेटीला

Bigg Boss-13 : ‘बिग बॉस आदेश देत आहेत…’ बिग बॉसच्या घरात आता महिलेचा आवाज!

Bigg Boss Marathi 2 | शिव ठाकरे बिग बॉस 2 चां विजेता

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *