AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Grover | कॉमेडियन सुनील ग्रोवरवर आली लसूण विकण्याची वेळ? व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक्!

'द कपिल शर्मा शो'चा सूत्रसंचालक आणि कॉमेडियन कपिल शर्मासोबत भांडण झाल्यानंतर सुनीलने हा शो सोडला होता. त्यानंतर त्याने काही वेब सीरिज आणि 'गुडबाय'सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

Sunil Grover | कॉमेडियन सुनील ग्रोवरवर आली लसूण विकण्याची वेळ? व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक्!
Sunil GroverImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 28, 2023 | 8:49 AM
Share

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : ‘द कपिल शर्मा शो’ने टेलिव्हिजनवर प्रचंड लोकप्रियता मिळवली. या कॉमेडी शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यापैकीच एक पात्र म्हणजे रिंकू भाभी. कॉमेडियन सुनील ग्रोवरने ही भूमिका साकारली होती. कधी डॉक्टर गुलाटी तर कधी रिंकू भाभी बनून तो प्रेक्षकांना खळखळून हसवायचा. हाच सुनील गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर कधी मका तर कधी दूध विकताना दिसून येत आहे. इतकंच काय तर सुनील रिक्षा चालवतानाही दिसला होता. आता त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो लसूण विकताना दिसून येत आहे.

खुद्द सुनीलनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लसूण विकतानाचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘हमरी अटरिया’ असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. यामध्ये सुनील सर्वसामान्य विक्रेत्याप्रमाणे बाजारात बसून लसूण विकताना दिसून येत आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी हो, सर्वकाही ठीक होईल’, असा सल्ला एकाने दिला. तर ‘भावा, लसूण विकून करोडपती बनण्याचं स्वप्न आहे का’, असा उपरोधिक सवाल दुसऱ्या युजरने केला.

‘द कपिल शर्मा शो’चा सूत्रसंचालक आणि कॉमेडियन कपिल शर्मासोबत भांडण झाल्यानंतर सुनीलने हा शो सोडला होता. त्यानंतर त्याने काही वेब सीरिज आणि ‘गुडबाय’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र ‘द कपिल शर्मा शो’मधून त्याला जी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली, ती अद्याप दुसऱ्या कोणत्या भूमिकेतून मिळाली नाही. या शोमध्ये त्याने साकारलेली ‘गुत्थी’ची भूमिका आजही लोकप्रिय आहे.

सप्टेंबर 2018 मध्ये सुनीलने सोडला होता शो

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर हे एकेकाळी एकमेकांचे खास मित्र होते. मात्र एके दिवशी असं काही घडलं ज्यामुळे सुनीलने कपिलचा शो सोडला आणि त्याच्यासोबतची मैत्रीही तोडली. सप्टेंबर 2018 मध्ये सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’ सोडला होता. त्यापूर्वी विमानातील एका प्रवासादरम्यान कपिलने सुनीलवर हात उचलला अशी चर्चा होती. या घटनेनंतर कपिलने अनेकदा सुनीलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही.

2020 दिलेल्या एका मुलाखतीत सुनीलसोबतच्या वादाबाबत कपिल म्हणाला होता, “छोटे छोटे वाद होतंच राहतात, पण त्याने नाती तुटत किंवा संपत नाहीत.” गेल्या वर्षी जेव्हा सुनीलला हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा कपिलने त्याच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.