उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा! कोण आहे उर्फीचा ‘ड्रिम बॉय’? सेलिब्रेशनचा सर्वत्र चर्चा
Urfi Javed Engagement: उर्फी जावेद करणार नव्या प्रवासाची सुरुवात, कोणासोबत गुपचूप उरकला साखरपुडा? सध्या सर्वत्र उर्फीने पोस्ट केलेल्या 'त्या' व्हिडीओची चर्चा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्फीची चर्चा...

Urfi Javed Engagement: मॉडेल उर्फी जावेद पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फीचे काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती उर्फीच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया आणि लोकांमध्ये उर्फीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. उर्फीन गुपचूप साखरपुडा उरकला का? उर्फी कसलं प्रमोशन करत आहे? अशा अनेक चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहेत. उर्फीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी अनेक अंदाज बांधत आहेत. आता खुद्द उर्फीने सत्य नक्की काय आहे सांगितलं आहे.
उर्फीचे काही फोटो पाहिल्यानंतर अनेकांना वाटलं ती आहे नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहे. पण असं काहीही नाही. उर्फी जावेद हिचा साखरपुडा झालेला नाही. उर्फी लवकरच नव्या ओटीटी शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शोबद्दल उर्फीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ शेअर करत उर्फी कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘ये इश्क नहीं आसान बस इतना समझ लीजिए धोखे का खतरा है, रोका करके जाना है…’ शिवाय उर्फीने #EngagedRokaYaDhoka या हॅशटॅगचा वापर केला आहे. तर शो 14 फेब्रुवारी पासून डिज्नी+ हॉटस्टार पर स्ट्रीमवर प्रदर्शित होणार आहे. म्हणजे व्हिडीओमध्ये दिसणारा साखरपुडा शोमधील एक भाग आहे. अशात तुम्हाला प्रश्न पडला असेल की, उर्फीच्या बोटात अंगठी घालणारा कोण आहे. तो दुसरा तिसरा कोणी नाही कॉमेडियन हर्ष गुजराल आहे. उर्फी आणि हर्ष दोघे मिळून शो होस्ट करणार आहेत.
उर्फी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, उर्फी मॉडल, एक्ट्रेस आणि सोशल मीडिया सेंशेसन देखील आहे. उर्फी तिच्या बोल्ड फॅशन आणि वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतेच. उर्फीने अनेक मालिकांमध्ये देखील भूमिका साकारली आहे. ‘बडे भैया की दुल्हनिया’, ‘मेरी दुर्गा’, ‘बेपनाह’ आणि ‘कसौटी जिंदगी के’ मध्ये देखील उर्फी दिसली.
‘बिग बॉस ओटीटी’ मुळे देखील उर्फीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सोशल मीडियावर उर्फी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून उर्फी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.