माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सलमान खानला वाचवलं, जामीन मिळाला नसता तर…, काय आहे संपूर्ण प्रकरण?
जगदीप धनखड हे राजकारणात येण्यापूर्वी प्रसिद्ध वकील होते. त्यांनी अभिनेता सलमान खानची बाजूही कोर्टात मांडली होती. त्यांच्यामुळे सलमान खानला जामीन मिळाला होता.

जगदीप धनखड यांनी काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. आरोग्याच्या कारणामुळे पद सोडत असल्याचे धनखड यांनी म्हटलं होतं. जगदीप धनखड हे राजकारणात येण्यापूर्वी प्रसिद्ध वकील होते. त्यांनी अभिनेता सलमान खानची बाजूही कोर्टात मांडली होती. त्यांच्यामुळे सलमान खानला जामीन मिळाला होता. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
सलमान खानला 1998 साली काळवीट शिकार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र जगदीप धनखड यांनी त्यांना जामीन मिळवून दिला होता. धनखड यांनी सलमान खान आणि या प्रकरणातील इतर आरोपी (सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे) यांची बाजू कोर्टात मांडली होती, त्यामुळे या सर्वांना जामीन मिळाला होता, त्यावेळी सलमानला जामीन मिळाला नसता, तर सलमानला बरेच दिवस तुरुंगात रहावे लागले असते.
समोर आलेल्या माहितीनुसार, काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान आणि इतर कलाकारांना जोधपूर पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी धनखड हे सलमान खानचा खटला लढवणारे पहिले वकील होते. धनखर यांचे तत्कालीन असिस्टंट प्रवीण बलवाडा यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली होती.
धनखड यांची नेमका काय युक्तिवाद केला होता?
एका मुलाखतीत धनखड यांना युक्तिवादाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना धनखड यांनी सांगितले की, ‘जर गावकऱ्यांच्या म्हणण्यांनुसार त्यांनी या कलाकारांना काळवीट मारताना पाहिले होते, मग त्यांनी त्याचा पाठलाग का नाही केला? तसेच पोलिसांनी सलमानला अटक केल्यानंतर तो तपासाला पूर्ण सहकार्य करत होता. त्यामुळे आम्ही जामीनाची मागणी केली आणि जामीन मिळाला.’
पुढील टप्प्यात दुसरा वकील
जगदीप धनखड यांनी सलमान खानसाठी फक्स पहिल्या टप्प्यात युक्तिवाद केला होता, मात्र दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या ऐवजी दुसऱ्या वकिलाने सलमानची बाजू मांडली होती. मात्र या घटनेच्या 20 वर्षांनंतर 2018 साली सलमानला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्याला दोन दिवस जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रवींद्र कुमार जोशी यांनी सलमानला 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता.
