‘पोपटा’चं गाणं सर्वात आधी कुणी गायलं?; आनंद शिंदेंकडे ते कसं आलं?; वाचा आनंद शिंदेंना स्टार बनविणाऱ्या गाण्याचा किस्सा!

आयुष्यातील एक निर्णय कुणाला कोणत्या स्थानावर नेऊन पोहोचवेल याचा काही नेम नसतो. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांच्या बाबतीत घडला आहे. (know about java navin popat ha marathi song)

'पोपटा'चं गाणं सर्वात आधी कुणी गायलं?; आनंद शिंदेंकडे ते कसं आलं?; वाचा आनंद शिंदेंना स्टार बनविणाऱ्या गाण्याचा किस्सा!
आनंद शिंदे-मिलिंद शिंदे, गायक
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 6:17 PM

मुंबई: आयुष्यातील एक निर्णय कुणाला कोणत्या स्थानावर नेऊन पोहोचवेल याचा काही नेम नसतो. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांच्या बाबतीत घडला आहे. ‘जवा नवीन पोपट हा…’ या गाण्याशी संबंधित हा किस्सा आहे. या एका गाण्याने आनंद शिंदे यांचं आयुष्य बदलून गेलं. नाव, पैसा, प्रतिष्ठा सर्व काही त्यांना या गाण्यामुळे मिळालं. नेमका काय आहे या गाण्याचा किस्सा?… आनंद-मिलिंद यांनीच सांगितलेली ही कहाणी वाचाच… (know about java navin popat ha marathi song)

मुरबाडचा कव्वालीचा सामना आणि पोपटाचं गाणं

‘जवा नवीन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला…’ या गाण्याचा किस्साच वेगळा आहे. साधारण 1984 ते 86 दरम्यानचा हा किस्सा आहे. त्यावेळी आनंद-मिलिंद यांना म्हणावी तशी ओळख मिळालेली नव्हती. पण गायक म्हणून ते तयार झालेले होते. त्यावेळी मिलिंद शिंदे आणि गायिका रंजना शिंदे यांचा मुरबाडला कव्वालीचा सामना होता. तेव्हा प्रसिद्ध गायक गोविंद म्हशीलकर यांचं ‘तुझ्या जवळची पेरुची फोड, लाल लाल पाहुनी, हा पोपट माझा, मिठू मिठू करतोय येड्यावाणी…’ हे गाणं खूप गाजत होतं. महाराष्ट्रातील त्यावेळचं हे एकमेव पोपटगीत होतं. या गाण्याचा गीतकार मानवेल गायकवाड यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला होता. त्यामुळे मानवेल गायकवाड यांनी…

आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या गं बोलण्याला, आता मी मानलं, शेजारचीही काळी मैना लागली डोलायला, जवा नवीन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला…

हे गाणं मिलिंद शिंदेंसाठी लिहिलं. मिलिंद शिंदे यांनी मुरबाडच्या सामन्यात हे गाणं गायलं होतं. परंतु, या गाण्याची चाल त्यावेळी वेगळी होती. ‘कोल्हेभाऊच्या लग्नात… लागली कोंबडी नाचायला…’ या गाण्याच्या चालीवर पोपटाच्या गाण्याची चाल बसवण्यात आली होती, असं आनंद शिंदे यांनी सांगितलं.

आधी म्हातारी मैना… नंतर काळी मैना

या गाण्याचा एक अजब किस्सा मानवेल गायकवाड यांनी सांगितला होता. रंजना शिंदे आघाडीच्या आणि सीनियर गायिका होत्या. तर मिलिंद नवखे होते. त्यामुळे रंजना शिंदे यांना कव्वालीच्या सामन्यात जेरीस आणायचं ठरलं. म्हशीलकरांच्या गाण्यावरून पोपटाचं गाणं लिहायचं, मिलिंद नवखा असल्याने त्याला नवीन पोपट म्हणायचं आणि रंजना शिंदेंना म्हातारी मैना चिडवायचं ठरलं. त्यानुसार गाणं लिहिलं गेलं. शब्द योजनाही तशी करण्यात आली. ते असं होतं…

आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या गं बोलण्याला, आता मी मानलं, शेजारचीही म्हातारी मैना लागली डोलायला, जवा नवीन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला…

हे गाणं त्या कव्वाली सामन्यात गायल्या गेलं. मिलिंदने गायलं. अत्यंत तन्मयतेनं गायलं. गाण्याची चाल सुरुवातीला वेगळी होती तरीही गाण्यानं हंगामा केला. त्यानंतर रेकॉर्डिंग वेळी हे गाणं आनंदला आवडलं आणि त्यांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड झालं. त्यातील ‘म्हातारी मैना’ ऐवजी ‘काळी मैना’ हा शब्द घेण्यात आला, असं मानवेल गायकवाड यांनी सांगितलं. त्यानंतर हिंदीतल पाप की दुनिया या चंकी पांडे अभिनित सिनेमातही याच गाण्यावरून ‘तु मेरी मैना, मै तेरा तोता…’ हे गाणं तयार करण्यात आलं होतं, असंही ते म्हणाले.

आणि आनंद शिंदेंकडे गाणं आलं

आनंद-मिलिंद यांना घेऊन गाण्याची एक कॅसेट निघावी अशी त्यांचे वडील आणि प्रसिद्ध लोकगायक प्रल्हाद शिंदे यांची इच्छा होती. त्यांनी प्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्याकडे तशी इच्छा बोलून दाखवली होती. विठ्ठल शिंदेही कॅसेट करायला तयार झाले. त्यासाठी गाण्यांची निवड करण्यात आली आणि गाण्याला चाली लावण्या सुरुवात झाली. तब्बल दीड महिना या कॅसेटच्या गाण्याच्या प्रॅक्टिस करण्यात आल्या. विठ्ठल शिंदे यांच्या घरीच ही गाणी बसवली जात होती. पण हे गाणं मला आवडलं आणि रेकॉर्डिंगवेळी हे गाणं मी गातो असं मी मिलिंदला सांगितलं. मिलिंदनेही मला हे गाणं दिलं आणि माझ्या आवाजात गाणं रेकॉर्ड झालं आणि पुढचा सारा इतिहास घडला, असं आनंद शिंदे सांगतात.

नाच रे मोरा… आणि पोपटाची चाल

या गाण्याची पूर्वीची चाल वेगळी होती. पण विठ्ठल शिंदे यांनी कॅसेटसाठी या गाण्याला नवी चाल बसवली. या गाण्यासाठी त्यांनी सहा चाली लावल्या होत्या. पण यातील एकही चाल आवडली नाही. त्यानंतर या गाण्याला सातवी चाल लावण्यात आली. चाल झक्कास जमली. भैरवी रागातील ही चाल होती. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच…’ या गाण्यातील ‘ढगांशी वारा झुंजला रे… काळा काळा कापूस पिंजला रे…’ या ओळींच्या पार्श्वस्थानी जे संगीत वाजतं त्या धूनवरून विठ्ठल शिंदे यांनी पोपटाच्या गाण्याला चाल लावली आणि हे गाणं हिट ठरलं…

इसमें कौनसी नयी बात है?, गाणं नाकारलं गेलं

या गाण्याचा दिवंगत विठ्ठल शिंदे यांनी एक किस्सा सांगितला होता. पोपटाच्या गाण्यावर प्रचंड मेहनत घेतली. सहा चाली लावून समाधान झाले नाही, म्हणून सातवी चाल लावली. चाल आवडली. त्यानंतर आम्ही रेकॉर्डिंगसाठी गेलो. पण व्हिनसच्या रेकॉर्डिंग विभाग प्रमुखांनी गाणं रेकॉर्ड करण्यास नकार दिला. ‘इसमें कौनसी नयी बात है?’ असं म्हणत त्याने गाणं नाकारलं. पण मी हट्टालाच पेटलो. अखेर या गाण्यासाठी आमच्या दोन बैठका घेतल्या आणि गाणं कॅसेटमध्ये घेण्यास रेकॉर्डिंग विभाग प्रमुखाने होकार दिला, असं विठ्ठल शिंदे यांनी सांगितलं होतं. पण नंतर आनंद-मिलिंदच्या आवाजात कॅसेट करण्यास या रेकॉर्डिंग विभागप्रमुखांनी नकार दिला. ही नवीन पोरं काय गाणार? कॅसेटची विक्री होईल का? असे सवाल त्यांनी केले. पण तिथेही शिंदे यांचा हट्ट पुन्हा अडवा आला आणि कॅसेट बाजारात आली. (know about java navin popat ha marathi song)

कॅसेट आली, पण विक्री नाही

तब्बल दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर पोपटाची कॅसेट बाजारात आली. पण कॅसेटचा काहीच खप झाला नाही. लोकांनी गाणं उचलून धरलं नाही. त्यानंतर पुन्हा हा अधिकारी वैतागला. त्यांनी विठ्ठल शिंदेंना बोलावून घेतलं आणि नव्या पोरांकडून गाऊन घेतल्यामुळेच गाणं गाजलं नसल्याचं सांगितलं. शिंदेंनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर त्यांना आकाशवाणीवर हे गाणं वाजवायला सांगितलं आणि पेपरला गाण्याची जाहिरात देण्याची सूचना केली. शिंदेंची ही मात्रा लागू पडली आणि गाणं हिट झालं. कॅसेट हातोहात खपली. कंपनीला लाखोंचा फायदा झाला तर आनंद-मिलिंद या गाण्यामुळे रातोरात स्टार झाले. (साभार, ‘आंबेडकरी कलावंत’ या पुस्तकातून) (know about java navin popat ha marathi song)

संबंधित बातम्या:

राजकारणातही ‘शिंदेशाही बाणा’, गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर?

Video : उस्तादाप्रमाणे तबला वाजवतेय सारा अली खान, तरीही नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

हरभजन सिंह क्रिकेटनंतर अभिनय क्षेत्रात लावणार चौके-छक्के, पाहा ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचा टीझर!

Video : सुखाच्या या सपनाला दार न्हाई….,जब्याच्या शालूचे हे नखरे पाहा!

(know about java navin popat ha marathi song)

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.