Kajol Viral Video: झूम करण्याची हिम्मत कशी झाली?; ड्रेसवरुन काजोल ट्रोल, भडकली अभिनेत्री
Kajol Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा असे दिसते की, युझर्स कोणत्या ना कोणत्या कारणाने चित्रपटातील ताऱ्यांना ट्रोल करत असतात. असेच काहीसे यावेळी काजोलसोबत घडले आहे. तसेच, पापाराझींच्या कृतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका अभिनेत्रीने तर कॅमेरा झूम करणाऱ्या वक्तीला चांगलेच सुनावले आहे.

इंटरनेटच्या दुनियेत दररोज कोणता ना कोणता सेलिब्रिटी ट्रोलिंगचा बळी ठरतो. नुकताच अभिनेत्री काजोल देखील याला बळी पडली आहे. काजोलने तिची आगामी वेब सीरिज ‘द ट्रायल: प्यार कानून धोखा’ च्या दुसऱ्या सीझनच्या ट्रेलर लॉन्चसाठी हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला होता. पण अनेकांना काजोलचा हा पेहराव आवडला नाही आणि ते तिला ट्रोल करू लागले. एवढेच नाही, ज्या फोटोग्राफरने तिचा व्हिडीओ शेअर केला, त्याच्या कृतीवरही एक अभिनेत्री संतापली.
सुनील कुमार गोल नावाच्या पापाराझीने ट्रेलर लॉन्च इव्हेंटमधून काजोलचा व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओ समोर येताच पोस्टवर अनेक कमेंट्स येऊ लागले. एका युझरने लिहीले, “ती खूप छान दिसत आहे, पण ड्रेस खूपच टाइट आहे, ती त्या सँडल्समध्ये चालूही शकत नाही. तुमच्या स्टायलिस्टला सोडा.” एकाने लिहिले, “असे वाटते की या इव्हेंटपूर्वी तिने पोटपूजा केली आहे.” लोकांच्या कमेंट्सवरून स्पष्ट होते की, ते काजोलला तिच्या ड्रेस आणि शरीरामुळे ट्रोल करत आहेत.
वाचा: तुझी बायको मला, माझी बायको तुला! छोट्या गावात घाणेरडा खेळ; वाईफ स्वॅपिंगची भानगड आहे तरी काय?
View this post on Instagram
अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
पापाराझीने काजोलचा जो व्हिडीओ शेअर केला, त्यात त्यांनी झूमही केले होते. यावरून टीव्ही होस्ट आणि अभिनेत्री मिनी माथुर पापाराझींवर भडकली आहे. तिने पोस्टवर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. ती म्हणाली, “तिच्या शरीरावर कॅमेरा झूम करण्याची तुमची हिम्मत कशी झाली? ती कशी दिसायला हवी, हे ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही.”
काजोलच्या समर्थनात उतरले चाहते
एकीकडे काही लोक काजोलच्या ड्रेसची थट्टा करत आहेत, तर दुसरीकडे असेही लोक कमी नाहीत, जे काजोलच्या समर्थनात उतरले आहेत. एका चाहत्याने अभिनेत्रीचे समर्थन करत लिहिले, “ती खूप गोड दिसत आहे.” ती ५० वर्षांची आहे आणि निरोगी, यशस्वी स्त्री आहे. तिची दोन मुले आहेत. कदाचित तिची निवड तिच्या लूकच्या दृष्टीने योग्य नसेल.” एका युझरने सांगितले की, इतरांच्या शरीरावर कमेंट करणाऱ्या पुरुषांना यातून जावे लागत नाही, कारण त्यांच्या शरीरात कोणतेही बदल होत नाहीत. पण महिलांसाठी नेहमी वेगळे मापदंड असतात.
