Karan Johar : अंडरवर्ल्डच्या धमकीवर पहिल्यांदाच करण जोहर याने केला मोठा खुलासा, लोक हैराण
करण जोहर हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच करण जोहर याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटाने जोरदार धमाका केला. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसले. या जोडीने मोठा धमाका केला.

मुंबई : करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा करण जोहर (Karan Johar) याच्यावर जोरदार टिका केली जाते. कॉफी विथ करण या शोमध्ये देखील बऱ्याच वेळा करण जोहर हा मोठे खुलासे करताना दिसतो. करण जोहर याच्या या शोमध्ये मोठे कलाकार हजेरी लावताना दिसतात. करण जोहर या शोमध्ये सतत आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचे नाव घेत असल्याने त्याच्यावर टिका केली गेली. इतकेच नाही तर एका व्हिडीओमध्ये चक्क आलिया भट्ट हिनेच करण जोहर याला विनंती केली की, माझे नाव तू इतके जास्त शोमध्ये घेऊ नकोस, कारण लोक मलाच ट्रोल करत आहेत.
नुकताच करण जोहर याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये सध्या करण जोहर हा चर्चेत आलाय. या मुलाखतीमध्ये करण जोहर याने काही मोठे खुलासे केले. इतकेच नाही तर यावेळी करण जोहर याने आपल्या आणि शाहरुख खान याच्या मैत्रीबद्दलही खुलासा केलाय. शाहरुख खान याने आपल्या वाईट काळात आपली कशाप्रकारे साथ दिली याबद्दलही बोलताना करण जोहर हा दिसला.
शाहरुख खान याने करण जोहर याच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांमध्ये खूप जास्त चांगली मैत्री आहे. करण जोहर याने सांगितले की, कुछ कुछ होता है चित्रपटाच्या प्रिमिअर वेळी मी स्वत: ला एका रूममध्ये बंद केले. ज्यानंतर शाहरुख खान याने माझी समजूत काढली आणि तो माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिला.
कुछ कुछ होता है चित्रपटाच्यावेळी मला थेट अंडरवर्ल्ड डॉनचा फोन आला. त्यावेळी तो फोन माझ्या आईने उचलला होता. त्यांनी थेट मला जीवे मारण्याची धमकी दिली. माझी आई आणि मी खूप जास्त घाबरलो होतो. त्यावेळी शाहरुख खान याने थेट माझ्या आईला म्हटले की, करणसाठी जी गोळी येईल, ती मी माझ्या अंगावर घेईल.
करण हा माझा भाऊ आहे. पुढे करण जोहर हा म्हणाला की, शाहरुख खान याने माझ्या प्रत्येक वाईट काळामध्ये माझी साथ दिलीये. करण जोहर याला अंडरवर्ल्ड डॉनकडून धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ त्यावेळी निर्माण झाली. करण जोहर याने अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला आतापर्यंत दिले आहेत. नेहमीच करण जोहर हा स्टार किड्सला लाॅन्च करताना दिसतो.
काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, शाहरुख खान याचा लेक आर्यन खान याला करण जोहर हाच लाॅन्च करणार आहे. मात्र, आता हे स्पष्ट झालंय की, आर्यन खान याच्या वेब सीरिजमध्ये करण जोहर याचा कॅमिओ आहे. फक्त करण जोहर हाच नाही तर रणबीर कपूर हा देखील आर्यन खान याच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. यंदा सुहाना खान ही देखील बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे.
