AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अवकारीका’ चित्रपटातून रोहित पवार करणार पदार्पण, काय असणार भूमिका?

लवकरच 'अवकारीका' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून मॉडेल आणि कोरियोग्राफर रोहित पवार रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.

'अवकारीका' चित्रपटातून रोहित पवार करणार पदार्पण, काय असणार भूमिका?
AwkarikaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 25, 2025 | 3:29 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सतत नवनव्या विषयांवर आधारित सिनेमे प्रदर्शित होत असतात. काही सिनेमांमध्ये कॉमेडीचा तडका असतो तर काही सिनेमे सामाजिक विषयांवर आधारित असतात. सध्या सर्व ‘अवकारीका’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या नावावरुन सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मॉडेल आणि फॅशन कोरियोग्राफर रोहित पवार रुपेरी पड‌द्यावर झळकणार आहे. तसेच त्याच्यासोबत दिसणारी कलाकार मंडळीसुद्धा प्रेक्षकांची मने जिंकत असतात. आता या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

काय आहे सिनेमाची कथा?

स्वछता कामगारांची व्यथा कुशलतेने हाताळत, समाजाला आरसा दाखविणारा ‘अवकारीका’ हा चित्रपट येत्या १ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या मराठी चित्रपटात रोहित पवार आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता विराट मडके सोबत तो स्क्रीन शेअर करणार आहे. रेडबड मोशन पिक्चर या बॅनर अंतर्गत बनलेल्या ‘अवकारीका’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा, संवाद, गीते अरविंद भोसले यांची असून सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर, सुनिधी चौहान अन ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या सुरानी हा चित्रपट सजला आहे.

वाचा: श्वेता तिवारी सुस्साट! थायलँडमध्ये तिने जे केलं त्यामुळे…

रोहित पवारने व्यक्त केला आनंद

आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, “रेडबड मोशन पिक्चर सोबत माझं नातं खूप वर्षापासून आहे. माझ्या खडतर प्रवासात त्यांनी मला खूप आधार दिला. आर्थिक अडचणी आल्या, खूप अपमान सहन करावा लागला, पण माझं ध्येय मात्र अढळ राहिलं. ‘अवकारीका’ माझ्यासाठी फक्त एक चित्रपट नाही, तर माझं स्वप्न आहे. माणूस म्हणून मी समाजासाठी काय देऊ शकतो, हा विचार मला ‘अवकारीका’ने दिला. या चित्रपटात मी चेंबर साफ करणाऱ्या स्वच्छतादूताची भूमिका केली आहे. शूटिंगदरम्यान मी या कामगारांना जवळून पाहिलं, त्यांच्या डोळ्यातली हतबलता, वेदना, तरीही कामाप्रती असलेली निष्ठा हे सगळं पाहून मी हेलावून गेलो. हा चित्रपट करताना माझ्या डोळ्यात अनेकदा पाणी आलं. हा केवळ अभिनय नव्हता, तर त्यांच्या वेदनेचा, संघर्षाचा, आत्मसन्मानाचा एक अंश माझ्यात अनुभवण्याचा प्रवास होता.”

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.