AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही अभिनेत्री समोर येताच संवाद विसरलेला नवाजुद्दीन सिद्दीकी, कोण आहे ती अभिनेत्री?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या समोर नवाजुद्दीन सिद्दीकी विसरलेला संवाद. पण त्याच चुकीमुळे चित्रपटातील सीन ठरला प्रचंड हिट. कोण आहे ती अभिनेत्री?

ही अभिनेत्री समोर येताच संवाद विसरलेला नवाजुद्दीन सिद्दीकी, कोण आहे ती अभिनेत्री?
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 19, 2026 | 2:30 PM
Share

बॉलिवूडमधील दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. वास्तववादी अभिनयशैली, संवादफेक आणि पात्रात पूर्णपणे समरस होण्याची त्याची क्षमता यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत त्याने त्याच्या अभिनय प्रवासातील एक रंजक आणि मजेशीर अनुभव सांगितला. विशेष म्हणजे हा किस्सा अभिनेत्री कतरिना कैफसोबतच्या ‘न्यूयॉर्क’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे.

न्यूज18 इंडियाशी संवाद साधताना नवाजुद्दीन सिद्दीकीने दिग्दर्शक कबीर खान यांच्या ‘न्यूयॉर्क’ या चित्रपटाच्या शूटिंगची आठवण सांगितली. त्याने सांगितले की, चित्रपटात एक असा प्रसंग होता ज्यामध्ये कतरिना कैफच्या पात्राची मुलाखत घेत असते. या दृश्यासाठी तिला तब्बल चार ते पाच पानांचे संवाद बोलायचे होते.

नवाजुद्दीन म्हणाला, त्या सीनसाठी माझ्याकडे चार-पाच पानांचे संवाद होते. मी ते पाठ करण्यापेक्षा त्यांचा अर्थ समजून घेतला आणि संपूर्ण प्रसंग मनात उभा केला. मात्र कॅमेरा सुरू झाल्यानंतर संवाद बोलताना अचानक मी अडखळलो आणि पुढचे संवादच विसरलो.

चुकेमुळे सीन झाला अधिक नैसर्गिक

संवाद विसरणे ही कोणत्याही कलाकारासाठी अवघड परिस्थिती असते. मात्र नवाजुद्दीनच्या बाबतीत याच गोष्टीचा उलट परिणाम झाला. त्याने सांगितले की, त्या क्षणी झालेली अडखळण त्याच्या पात्राचा नैसर्गिक भाग वाटू लागली.

तो म्हणाला, मी संवादात अडकलो, पण त्यामुळे त्या दृश्यात एक वेगळीच नैसर्गिकता आली. माझ्या पात्रामध्ये एक ताजेपणा निर्माण झाला. प्रेक्षकांना मी अभिनय करत आहे असे वाटले नाही तर मी खरोखरच त्या व्यक्तीसारखा बोलत आहे अशी भावना निर्माण झाली.

‘परफेक्शन’पेक्षा ‘इम्परफेक्शन’ अधिक आवडते

नवाजुद्दीनने अभिनयाबाबत आपले मतही व्यक्त केले. त्याच्या मते, प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात अभिनय कृत्रिम वाटू शकतो. माझ्या मते, परफेक्शन अनेकदा खूप मेकॅनिकल वाटते. उलट छोट्या-छोट्या चुका किंवा अपूर्णता एखाद्या व्यक्तिरेखेला अधिक जिवंत आणि वास्तववादी बनवतात. अनेकदा प्रेक्षकांनाही अशा नैसर्गिक गोष्टी अधिक आवडतात.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक