Test Movie Review: आर माधवनच्या अभिनयाने बदलली खलनायकाची व्याख्या, वाचा ‘टेस्ट’ सिनेमाचा रिव्ह्यू
'टेस्ट' हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात आर माधवन, नयनतारा आणि सिद्धार्थ हे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. वाचा काय आहे सिनेमाची कथा...

सध्या ओटीटीची क्रेझ पाहायला मिळते. वेगवेगळ्या विषयावर आधारीत दिग्गज कलाकारांचे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसतात. नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिनेता आर माधवन, साऊथ सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता सिद्धार्थचा ‘टेस्ट’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. एस शशिकांत यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता होती. आता अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय आहे चला जाणून घेऊया… ‘टेस्ट’ या चित्रपटात क्रिकेटची एक कहाणी आहे. ही एका सामन्याची कहाणी आहे. हा सामना फिक्स असल्याची माहिती त्या काळातील दोन महान खेळाडूंना कळली आहे....