Photo : ‘ओय, तुनक तुनक ओय !!’, लाडक्या स्वीटूचा पंजाबन अंदाज

सध्या अन्विता स्वीटूच्या व्यक्तीरेखेसह महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य करतेय. तिचा गोड अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. (‘Oy, tunak tunak oy !!’, Punjabi look of sweetu Anvita Phaltankar)

1/5
Anvita Phaltankar
झी मराठीवरील लोकप्रिय मालिके ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आता जवळची वाटू लागली आहे. मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या स्वीटूनं आपल्या निरागस आणि सोज्वळतेने सगळ्यांचं लक्षं आपल्याकडे वेधून घेतलं आहे. स्वीटूची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्रीचं नाव अन्विता फलटणकर आता मालिकेत पंजाबी लूकमध्ये दिसणार आहे.
2/5
Anvita Phaltankar
अन्वितानं आता काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटो सोबत ‘#WannaBePunjabi ओय, तुणक तुणक ओय !! 🙈 Excitement level 💯 !💃🏻💃🏻 Those who follow me from the beginning know how obsessed I am with Punjabi songs and vibes. So.....YAYYY ! ❤️❤️’ असं कॅप्शन दिलं आहे.
3/5
Anvita Phaltankar
सध्या अन्विता स्वीटूच्या व्यक्तीरेखेसह महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य करतेय. तिचा गोड अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय.
4/5
Anvita Phaltankar
अन्विताने याआधी अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अन्विताने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्विता ‘रुमी’च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे. अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही तिने काम केलं.
5/5
Anvita Phaltankar
स्क्रिन वर साधी सरळ भूमिका करत असणारा कलाकार ऑफ स्क्रिन स्टायलिश राहतो. स्विटू स्क्रिन वर जरी निरागस असली तरी पडद्यामागे खूप वेगळी आहे.