माई झाल्या मोलकरीण, तर माधव वेडा भिकारी! नाईकांच्या घराची अवस्था पाहून प्रेक्षकही हळहळले

पहिल्याच भागात केवळ अण्णा दिसले, तर फोटोत शेवंताची झलक पाहायला मिळाली. मात्र, या सगळ्यात प्रेक्षक नाईकवाडा सांभाळणारी ‘माई’ आणि कुटुंबातील इतर मंडळी शोधत होते.

माई झाल्या मोलकरीण, तर माधव वेडा भिकारी! नाईकांच्या घराची अवस्था पाहून प्रेक्षकही हळहळले
माई आणि माधव
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 8:44 AM

मुंबई : ‘अण्णा नाईक’ परत येणार, याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु होती. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्येच अण्णा नाईकांची क्रेझ होती. प्रत्येकजण अण्णांची आतुरतेने वाट बघत होता. अखेर काल (22 मार्च) अण्णा नाईक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पहिल्याच भागात अण्णांचा दरारा पुन्हा अनुभवायला मिळाला आहे. ‘रात्रीस खेळ चाले 2’मध्ये अण्णा, माई, शेवंता या पात्रांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. आता ‘रात्रीस खेळ चाले 3’ मध्ये (Ratris Khel Chale 3) काय असणार याचीच उत्सुकता सर्वांना आहे (Ratris Khel Chale 3 new promo first look of Mai and Madhav).

पहिल्याच भागात केवळ अण्णा दिसले, तर फोटोत शेवंताची झलक पाहायला मिळाली. मात्र, या सगळ्यात प्रेक्षक नाईकवाडा सांभाळणारी ‘माई’ आणि कुटुंबातील इतर मंडळी शोधत होते. पहिल्याच भागात कुटुंब दिसलं नाही, तर सगळे नेमके गेले कुठे हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र, त्यांच्या या प्रश्नांचे उत्तर या नव्या प्रोमोने दिले आहे.

पाहा मालिकेचा नवा प्रोमो

 (Ratris Khel Chale 3 new promo first look of Mai and Madhav)

या प्रोमोमध्ये माई वृद्ध झालेल्या दाखवलेल्या असून, त्या घराजवळ भांडी घासताना दिसल्या आहेत. तर, माई वयस्कर झाल्या असून वाडा न विकण्याचं त्या ठरवतात. या वाड्यात त्यांच्या परिवाराच्या आठवणी असल्याचं त्या सांगतात. तर, दुसरीकडे अण्णा नाईकांचा मोठा मुलगा अर्थात भोळा माधव पूर्ण बदललेल्या रुपात पाहायला मिळाला. केस वाढलेले, अंगावर फटके आणि घाणेरडे कपडे तर कोणालाही न ओळखणारा माधव पाहून प्रेक्षक देखील हळहळले आहेत. मात्र, या दोघांची झलक दिसल्याने आता मालिकेत नेमकं काय घडणार अशी उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

अशी रंगणार नाईक वाड्याची कथा…

अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात लागली. अतृप्त आत्म्यानी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको, इंदू उर्फ माई नाईक घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या स़कटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्रीसुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. त्याची ही एक रंजक कथा असणार आहे. नाईक घराण्याचं पाप…शाप… आणि उ:शाप यामधून झालेलं संक्रमण म्हणजेच ‘रात्रीस खेळ चाले 3’ असणार आहे.

(Ratris Khel Chale 3 new promo first look of Mai and Madhav)

हेही वाचा :

Video | ‘झुठे नैना बोले…’ इंडियन आयडॉलच्या मंचावर अंजलीच्या शास्त्रीय गाण्याने बहार! पाहा व्हिडीओ…

‘बार्डो’च्या ‘रान पेटलं’साठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार, सावनी सांगतेय कसं तयार झालं ‘हे’ गाणं…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.