Republic Day 2021 | प्रजासत्ताक दिनाला बघा देशप्रेमाच्या या खास वेब सीरीज!

आज देशात ‘72 वा प्रजासत्ताक दिन’ उत्साहात साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचा उत्सव संपूर्ण देशामध्ये सुरू आहे.

Republic Day 2021 | प्रजासत्ताक दिनाला बघा देशप्रेमाच्या या खास वेब सीरीज!

मुंबई : आज देशात ‘72 वा प्रजासत्ताक दिन’ उत्साहात साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचा उत्सव संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. राजपथावर भारताची विविधता आणि सामर्थ्य दर्शविणारी दृश्ये दाखवले जात आहे. तर सोशल मीडियावर देखील प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. या खास प्रसंगी तुमच्यासाठी अशाच काही उत्कृष्ट वेब सीरीज आहेत. ज्या तुम्ही आज नक्की बघितल्या पाहिजेत. (Republic Day special web series)

1. ‘द टेस्ट केस’
अल्ट बालाजीवर द टेस्ट केस ही वेब सीरिज आहे. याची स्टोरी सेना आणि पुरुषप्रधान देशावर आधारित आहे. कॅप्टन शिखा शर्मा म्हणजेच निमरत कौर ही महिला सैनिक असून पुरुषप्रधान देशात आपली ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. या वेब सीरिजमध्ये निमरत कौर व्यतिरिक्त अक्षय ओबेरॉय, राहुल देव, अतुल कुलकर्णी आणि अनूप सोनी हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर जूही चावला संरक्षणमंत्री म्हणून यामध्ये भूमिका साकारणार आहे.

2. ‘जीत की जिद’
ऑफिसर मेजर दीप सिंग यांच्या जीवनावर आधारित जी -5 वर ही वेब सीरिज आहे. कारगिलमध्ये ऑपरेशन दरम्यान मेजर दीप सिंग गंभीर जखमी झाले होते. अशा परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन त्यांनी हार न मानता संघर्ष करत परत आले असे या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. अमित साध, अमृता पुरी, सुशांत सिंग या वेब सीरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

3. ‘कोड एम’
ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि जी- 5 वर आहे. यामध्ये दहशतवादी चकमकीच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या भारतीय लष्कराच्या वकीलाची स्टोरी यामध्ये दाखवण्यात आली आहे. या चकमकीत 2 दहशतवादी मारले गेले आणि एक सैनिक शहीद झाला होता. मोनिका मेहरा नावाच्या एका वकिलाने या प्रकरणाचा तपास केला आणि त्यातलं सत्य समोर आलं.

4. ‘बोस डेड/ अलाइव’
राजकुमार राव यांची ही वेब सीरीज ऑल्ट बालाजीवर आहे. यात राजकुमार राव यांनी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारली होती. यात नेताजींच्या तरूणापासून ते स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या जवळपास सर्व घटना दर्शविल्या गेल्या आहेत. या व्यतिरिक्त, त्याच्या मृत्यूची न सुटलेली कथा देखील दर्शविली गेली आहे.

संबंधित बातम्या : 

तांडवचे दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या घरी उत्तर प्रदेश पोलीस…

Breaking News | मिर्झापूरचे दिग्दर्शक आणि OTT विरोधात सुप्रीम कोर्टाने काढली नोटीस, पाहा काय कारण!

(Republic Day special web series)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI