तांडवचे दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या घरी उत्तर प्रदेश पोलीस…

अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar)यांच्या मुंबईतील घरी उत्तर प्रदेशचे पोलिस पोहोचले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:35 PM, 21 Jan 2021
तांडवचे दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या घरी उत्तर प्रदेश पोलीस...

मुंबई : अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar)यांच्या मुंबईतील घरी उत्तर प्रदेशचे पोलीस पोहोचले होते. चौकशीसाठीची नोटीस देण्यासाठी पोलीस अलीच्या घरी गेल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात तांडव वेब सीरीजच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ज्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलिस थेट मुंबईत पोहचले आहेत. काल मुंबई हायकोर्टाने वेब सीरीज तांडवच्या टीमला अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्याला ट्रान्झिट बेल म्हटले जात, त्यामुळे उत्तर प्रदेशातील पोलीस तांडवच्या टीमला अटक करू शकणार नाही. (Uttar Pradesh Police at the house of Ali Abbas Zafar)

दिग्दर्शक अली अब्बास जफर, अ‍ॅमेझॉन कंटेंट हेड अपर्णा पुरोहित, निर्माता हिमांशु मेहरा आणि लेखक गौरव सोलंकी यांना दिलासा मिळाला आहे. बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनीही ‘तांडव’ या वेब सीरीजमधील आक्षेपार्ह देखावे आणि संवाद काढावा असे आवाहन निर्मात्यांना केले होते. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सोमवारी ट्वीट केले होते.

तांडव विरोधात विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली, मुंबई आणि लखनऊमध्ये तांडवच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी लखनऊ पोलिसांच्या चार अधिकाऱ्यांची एक टीम मुंबईला दाखल झाली आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

जफर यांनी माफी मागितली असली तरी अजूनही अॅमेझॉनवर ही सीरिज दाखवली जात आहे. या सीरिजचे सर्व हक्क अॅमेझॉनकडे आहेत. त्यामुळे सरकार आणि आक्षेप घेणाऱ्यांना उत्तर देण्याची जबाबदारी अॅमेझॉनवर असून अॅमेझॉन काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या : 

Breaking News | मिर्झापूरचे दिग्दर्शक आणि OTT विरोधात सुप्रीम कोर्टाने काढली नोटीस, पाहा काय कारण!

‘तांडव’ वेब सीरीजचा वाद कधी थांबणार? वाचा आतापर्यंत काय घडलं…

(Uttar Pradesh Police at the house of Ali Abbas Zafar)