AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif Pregnant : कतरिनाच्या ‘गुड न्यूज’वर सलमान खानने दिल्या शुभेच्छा? पोस्ट व्हायरल

Katrina Kaif Pregnant : अभिनेत्री कतरिना कैफ गरोदर असून काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत 'गुड न्यूज' दिली. त्यावर आता सलमान खानने तिला शुभेच्छा दिल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमागचं सत्य जाणून घ्या..

Katrina Kaif Pregnant : कतरिनाच्या 'गुड न्यूज'वर सलमान खानने दिल्या शुभेच्छा? पोस्ट व्हायरल
Salman Khan and Katrina Kaif, Vicky KaushalImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 25, 2025 | 10:39 AM
Share

Katrina Kaif Pregnant : अभिनेत्री कतरिना कैफने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली. लग्नाच्या चार वर्षांनंतर ती गरोदर असून कौशल कुटुंबात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं किंवा पाहुणीचं आगमन होणार आहे. पती विकी कौशलसोबतचा खास फोटो शेअर करत तिने ही गोड बातमी दिली. या फोटोमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळाला. विकी आणि कतरिनाच्या या पोस्टवर बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच अभिनेता सलमान खानचीही एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सलमानने कतरिना आणि विकीला शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्ट व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. गेल्या काही महिन्यांपासून कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा होत्या. अखेर या दोघांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लवकरच आई-बाबा होणार असल्याचं जाहीर केलं. यानंतर सलमानच्या नावाने एक पोस्ट समोर आली. सलमानने कतरिना-विकीचा फोटो शेअर करत त्यांना इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्याचं यामध्ये पहायला मिळालं. परंतु जेव्हा नेटकऱ्यांनी सलमानच्या अधिकृत अकाऊंटवर जाऊन पोस्ट पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती पोस्ट दिसलीच नाही. यावरून त्याने ती पोस्ट डिलिट केल्याचा अंदाज लावला. परंतु सलमानच्या या व्हायरल पोस्टमागचं सत्य वेगळंच आहे.

सलमान खानची व्हायरल पोस्ट-

सध्या AI चा जमाना असल्याने कोणचाही, कोणताही फोटो अगदी सहज हवा तसा एडिट करू शकतो. सलमानच्या या पोस्टच्या बाबतीतही असंच काहीसं आहे. सलमानने कतरिना आणि विकीला शुभेच्छा दिल्याच नाहीत. त्याची ही संपूर्ण पोस्ट फेक म्हणजेच बनावट आहे. सलमान आणि कतरिनाचं जुनं नातं पाहता काही नेटकऱ्यांनी अशी पोस्ट एडिट करून व्हायरल केली आहे. कतरिनाला सलमाननेच बॉलिवूड इंडस्ट्रीत लाँच केल्याचं म्हटलं जातं. हे दोघं एकेकाळी एकमेकांना डेट करत होते. परंतु काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. कतरिनाने 2021 मध्ये विकी कौशलशी लग्न केलं. कतरिना ही विकीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.