AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIGG BOSS 19 च्या मंचावर धर्मेंद्र यांचा ‘तो’ व्हिडीओ लावला; सलमान खान लहान मुलासारखा रडत होता

'बिग बॉस 19' च्या मंचावर धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचा खास व्हिडिओ बिग बॉसच्या 19च्या फिनालेमध्ये लावण्यात आला. तो व्हिडीओ पाहताना सलमान खान खूप भावुक झाला. त्याला अश्रू आवरता आले नाहीत. धर्मेंद्र आणि सलमानचे नाते वडील-मुलासारखे घट्ट होते. धर्मेंद्र सलमानला आपला तिसरा मुलगा मानत असत. त्यांच्या आठवणींनी सलमानसह उपस्थित सर्वजण गहिवरले.

BIGG BOSS 19 च्या मंचावर धर्मेंद्र यांचा 'तो' व्हिडीओ लावला; सलमान खान लहान मुलासारखा रडत होता
salman khan cried on bigg boss 19, emotional dharmendra tribute videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 07, 2025 | 11:53 PM
Share

बॉलिवूडचे सदाबहार सुपरस्टार धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सोमवारी विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड जमलं होतं. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. दरम्यान ‘बिग बॉस 19’ च्या फिनालेमध्ये धर्मेंद्र यांचा व्हिडीओ लावताच सलमान खान भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

धर्मेंद्र आणि बिग बॉस यांचे एक खास नाते होते.

धर्मेंद्र आणि बिग बॉस यांचे एक खास नाते होते. सलमान खान हा त्यांचा आवडता होस्ट होता. धर्मेंद्र आणि सलमान खान यांचे नाते बिग बॉसच्या मंचापुरते मर्यादित नव्हते तर ते त्याच्यासाठी वडिलांच्या जागी होते. धर्मेंद्र यांनी बिग बॉसच्या मंचावर सलमान खानला वारंवार त्यांचा तिसरा मुलगा म्हणून संबोधले होते. त्यांनी सांगितले की त्यांना सलमान खानमध्ये त्यांच्या स्वतःच्या “रंगीत” आणि भावनिक स्वभावाची झलक दिसते. धर्मेंद्र आणि सलमान यांचे नाते खूप घट्ट होते. जेव्हा धर्मेंद्र सलमानच्या बिग बॉसच्या मंचावर जेव्हा जेव्हा आले होते तेव्हा बिग बॉसच्या मंचावर चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमामुळे आणि सलमानच्या सूत्रसंचालनामुळे आनंदित होऊन, धर्मेंद्र यांनी सलमानला परत येण्याचे वचन दिले होते. चाहत्यांना आशा होती की तो बिग बॉस 19 च्या ग्रँड फिनाले किंवा विशेष भागात दिसतील, सलमानची देखील तिच इच्छा होतीय परंतु वयाच्या 89 व्या वर्षी त्याच्या अचानक जाण्याने हे वचन अपूर्ण राहिले.

View this post on Instagram

A post shared by Filmy Hoon (@filmyhoon2)

सलमान खानला त्याच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते

धर्मेंद्र यांची बिग बॉसच्या मंचावर असलेली आठवण पुन्हा एकदा जीवंत करण्यासाठी सलमान खानने आणि धर्मेंद्र यांनी बिग बॉसच्या सेटवर घालवलेल्या आनंदी क्षणांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यामध्ये धर्मेंद्र जेव्हा जेव्हा बिग बॉसच्या मंचावर आले होते ते काही क्षण दाखवण्यात आले. सलमान खान आणि धर्मेंद्रचे अनेक फोटो, व्हिडीओ देखील दाखवण्यात आले, या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांनी सलमान खानला मिठी मारतानाचा क्षणही होता. हे सर्व पाहून सलमान खानला त्याच्या डोळ्यातील पाणी मात्र लपवता आले नाही. सलमान खान धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच्या डोळ्यातील पाणी थांबतच नव्हते. दरम्यान सलमानसोबतच इतर उपस्थित स्पर्धकही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

सलमान खानने धर्मेंद्र यांचे कौतुक करताना म्हटले की त्यांच्यासारखा दुसरा कोणताही अभिनेता नाही

सलमान खानने धर्मेंद्र यांच्या आठवणी सांगितल्या. तसेच सलमान खानने धर्मेंद्र यांचे कौतुक करताना म्हटले की त्यांच्यासारखा दुसरा कोणताही अभिनेता नाही. त्यांनी सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने असेही म्हटले की त्याने त्याच्या कारकिर्दीत फक्त धर्मेंद्र यांनाच फॉलो केलं आहे. हे सर्व बोलत असताना सलमान खानच्या डोळ्यातील पाणी मात्र थांबत नव्हते.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....