Shahid Kapoor | पत्नी मीराच्या ‘या’ दोन सवयींमुळे वैतागला शाहिद कपूर; मीरा म्हणते “मी तुला सरळ करणारच!”

मीरासोबतच्या लग्नाबद्दल शाहिद एका मुलाखतीत म्हणाला होता, "मी आता लग्नानंतर तिच्यावर प्रेम करू लागलोय. दररोज मला तिच्याशी प्रेम होतं. जेव्हा मी मीराला भेटलो, तेव्हा आम्ही जवळपास सात तास गप्पा मारत होतो," असं तो म्हणाला.

Shahid Kapoor | पत्नी मीराच्या 'या' दोन सवयींमुळे वैतागला शाहिद कपूर; मीरा म्हणते मी तुला सरळ करणारच!
Mira Rajput and Shahid KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 5:59 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहिद कपूरने त्याच्या सर्व चाहतींचा हृदयभंग तेव्हा केला, जेव्हा त्याने मीरा राजपूतशी लग्न केलं. 7 जुलै 2015 रोजी शाहिदने मीराशी अरेंज्ड मॅरेज केलं. या लग्नसोहळ्याला फक्त कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. मीरा आणि शाहिदला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. या दोघांच्या लग्नाला लवकरच आठ वर्षे पूर्ण होणार असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिद मीराविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. शाहिद आणि मीराची जोडी ही ‘मेड फॉर इच अदर’ वाटते. मात्र प्रत्येक विवाहित जोडप्यांमध्ये काही ना काही तक्रारी असतात. अशाच काही तक्रारी शाहिदने या मुलाखतीत बोलून दाखवल्या आहेत.

शाहिदने या मुलाखतीत मीराच्या सर्वांत वाईट सवयींबद्दल सांगितलं. “तिची सर्वांत नावडणारी सवय म्हणजे ती सकाळी लवकर उठत नाही. तिला सकाळी 9 वाजता उठवण्याचा प्रयत्न केला तरी ती चिडून बडबड करू लागते”, असं तो म्हणाला. मीराच्या आणखी एका वाईट सवयीबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, “ती मला कोणत्याच गोष्टीचं श्रेय देत नाही. मी त्याला सरळच करेन, असं काहीसं तिचं माझ्यासोबत आहे.” यानंतर शाहिदने मीराचं कौतुक करत तिच्या काही चांगल्या गोष्टीसुद्धा सांगितल्या. “मीरा फार प्रामाणिक, स्पष्ट आणि खरी आहे. ती जशी आहे तशी मला आवडते. सध्याच्या काळात अशी लोकं फार कमी असतात”, असं शाहिद म्हणाला.

हे सुद्धा वाचा

मीरासोबतच्या लग्नाबद्दल शाहिद एका मुलाखतीत म्हणाला होता, “मी आता लग्नानंतर तिच्यावर प्रेम करू लागलोय. दररोज मला तिच्याशी प्रेम होतं. जेव्हा मी मीराला भेटलो, तेव्हा आम्ही जवळपास सात तास गप्पा मारत होतो. आम्ही लग्नाआधी फार वेळा डेटवर गेलो नाही. फक्त तीन-चार वेळा भेटलो होतो.” शाहिदने 2015 मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं. मीरा ही शाहिदपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे. लग्नाच्या वेळी ती 21 वर्षांची होती. या दोघांना दोन मुलं आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.