श्रद्धा कपूरने कुटुंबासाठी मुस्लीम बॉयफ्रेंडला सोडलं, खऱ्या प्रेमाबद्दल अभिनेत्री म्हणाली…
Shraddha Kapoor on Boyfriend: श्रद्धा कपूर हिने कुटुंबासाठी मुस्लीम बॉयफ्रेंडला सोडलं, एक्स-बॉयफ्रेंडने केलं दुसरं लग्न, खऱ्या प्रेमाबद्दल अभिनेत्री म्हणाली..., गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Shraddha Kapoor on Boyfriend: अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते श्रद्धाच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत तर असतातच, पण आता श्रद्धा तिच्या लग्नाची अधिकृत घोषणा कधी करते याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत श्रद्धा कपूर हिने लग्नाबद्दल मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे श्रद्धा आणि प्रेमप्रकरणांची तुफान चर्चा रंगली आहे. अनेकांसोबत ब्रेकअप झाल्यानंतर श्रद्धाला तिचा जोडीदार भेटला आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत श्रद्धा हिने तिच्या जोडीदाराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
खासगी आयुष्याबद्दल श्रद्धा कपूर म्हणाली, ‘मी रिलेशनशिपमध्ये आहे आणि मला माझ्या जोडीदारासोबत वेळ व्यतीत करायला फार आवडतं. आम्ही एकत्र सिनेमा पाहातो. फिरायला जातो….’ असं अभिनेत्री म्हणाली, पण यावेळी श्रद्धाने कोणाला डेट करतेय? यावर मात्र मौन बाळगलं आहे.
श्रद्धा कपूर हिचा एक्स बॉयफ्रेंड
श्रद्धा कपूर हिच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत झाली. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अभिनेता फरहान अख्तर याच्यासोबत देखील श्रद्धाच्या नावाची चर्चा झाली. पण फरहान मुस्लीम असल्यामुळे श्रद्धाच्या कुटुंबियांना दोघांचं नातं मान्य नव्हतं. म्हणून दोघांचं ब्रेकअप झालं असं देखील सांगण्यात येत.
रिपोर्टनुसार, 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉक ऑन २’ सिनेमानंतर फरहान आणि श्रद्धा यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. रिपोर्टनुसार, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक रिपोर्टनुसार, शक्ती कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे (श्रद्धाची मावशी) फरहान अख्तरच्या अपार्टमेंटमध्ये गेले आणि त्यांनी श्रद्धा कपूरला अपार्टमेंटमधून बाहेर काढल होतं.
तेव्हा कोणत्या चर्चा रंगू नये म्हणून श्रद्धा कपूर काहीही न बोलता फरहानच्या घरातून बाहेर पडली. जेव्हा ही गोष्ट वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली तेव्हा शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं.
फरहान अख्तर दुसरं लग्न
अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरने शिबानी दांडेकरशी दुसरं लग्न केलं. त्याआधी 16 वर्षांच्या संसारानंतर त्याने अधुनाला घटस्फोट दिला होता. अधुना आणि फरहान याला दोन मुली देखील आहेत.
