AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Subhedar | बॉक्स ऑफिसवर ‘सुभेदार’चा बोलबाला; पाच दिवसांत कमावले इतके कोटी रुपये

केवळ कमाईच्या बाबतीत नाही तर IMDb रेटिंगच्या बाबतही या चित्रपटाने बाजी मारली आहे. IMDb रेटिंगच्या शर्यतीत दिग्पालच्या 'सुभेदार'ने अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ला मागे टाकलं आहे.

Subhedar | बॉक्स ऑफिसवर 'सुभेदार'चा बोलबाला; पाच दिवसांत कमावले इतके कोटी रुपये
SubhedarImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 30, 2023 | 10:20 AM
Share

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : बॉक्स ऑफिसवर सध्या ‘गदर 2’ आणि ‘ड्रीम गर्ल 2’ या दोन बॉलिवूड चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण गेल्या काही दिवसांत या दोन्ही चित्रपटांनी दमदार कमाई केली आहे. या दोन बॉलिवूड चित्रपटांच्या शर्यतीत ‘सुभेदार’ हा मराठमोळा चित्रपट उल्लेखनीय कामगिरी करताना दिसतोय. 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने गेल्या पाच दिवसांत कोट्यवधींची कमाई केली आहे. मोजके शोज आणि बॉलिवूड चित्रपटांकडून तगडी टक्कर असतानाही ‘सुभेदार’ने केलेली कमाई कौतुकास्पद आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात कलाकारांची मौठी फौज आहे. यामध्ये अजय पूरकरने तान्हाजी मालुसरेंची मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात स्मिता शेवाळे, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

‘सुभेदार’ने आतापर्यंत जवळपास 6.48 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने एक कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. तर रविवार कमाईचा आकडा 2 कोटींवर पोहोचला.

सुभेदारची आतापर्यंतची कमाई

शुक्रवार- 1.15 कोटी रुपये शनिवार- 1.69 कोटी रुपये रविवार- 2.22 कोटी रुपये सोमवार- 0.72 कोटी रुपये मंगळवार- 0.70 कोटी रुपये एकूण- 6.48 कोटी रुपये

‘सुभेदार’ने अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ला टाकलं मागे

केवळ कमाईच्या बाबतीत नाही तर IMDb रेटिंगच्या बाबतही या चित्रपटाने बाजी मारली आहे. IMDb रेटिंगच्या शर्यतीत दिग्पालच्या ‘सुभेदार’ने अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ला मागे टाकलं आहे. अजय देवगणच्या चित्रपटाला 7.5 IMDb रेटिंग आहे. तर ‘सुभेदार’ला 9.7 रेटिंग मिळाली आहे. अजयचा ‘तान्हाजी’ हा चित्रपटसुद्धा तान्हाजी मालुसरे यांच्यावर आधारित होता. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता.

आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. IMDb हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. 10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.