Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चुकीच्या नात्यात राहण्यापेक्षा…’, घटस्फोटानंतर हृतिकच्या पहिल्या बायकोचं वक्तव्य

Sussanne Khan on Divorce: लग्नाच्या 13 वर्षानंतर सुझान खान आणि हृतिक रोशन यांनी घेतला विभक्त होण्याचा निर्णय, घटस्फोटानंतर अभिनेत्याची पहिली पत्नी म्हणली, 'चुकीच्या नात्यात राहण्यापेक्षा...'

'चुकीच्या नात्यात राहण्यापेक्षा...', घटस्फोटानंतर हृतिकच्या पहिल्या बायकोचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 3:40 PM

Sussanne Khan on Divorce: बॉलिवूडमध्ये ब्रेकअप, घटस्फोट या गोष्टी आता सामान्य झाल्या आहेत. अनेक वर्ष एक राहिल्यानंतर, अनेक वर्ष एकत्र संसार केल्यानंतर काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. असचं काही अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत देखील झालं आहे. हृतिक आणि त्याची पहिली पत्नी सुझान खान यांनी जेव्हा घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली तेव्हा चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. लग्नाच्या 13 वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये अनेक चर्चा रंगल्या.

हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट 2014 मध्ये झाला. दोन मुलांच्या जन्मानंतर हृतिक आणि सुझान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण आज देखील सुझान, हृतिक याला Rey म्हणून हाक मारते. घटस्फोटानंतर दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. शिवाय मुलासोबत दोघांना सुट्ट्यांचा आनंद लुटताना देखील स्पॉट करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

दरम्यान, घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर म्हणजे 2016 मध्ये सुझान हिने घटस्फोटाचं कारण सांगितलं होतं. सुझान म्हणाली होती, ‘आम्ही एका अशा टप्प्यावर पोहोचलो होते, जेथून आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि विभक्त होण्याचा निर्णय योग्य ठरला.’

‘आता आपण एका चुकीच्या नात्यात आहोत… हे सत्य माहिती असून एकत्र राहण्यामध्ये काहीच अर्थ नव्हता…’ असं देखील सुझान घटस्फोटानंतर म्हणाली होती. एवढंच नाही तर, सुझान आणि हृतिक यांचा घटस्फोट सर्वात महागडा घटस्फोट होता… अशी देखील चर्चा रंगली. हृतिक याने पोटगी म्हणून सुझान हिला 400 कोटी रुपये दिल्याची देखील चर्चा रंगली होती. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत… असं देखील अभिनेता म्हणाला होता.

घटस्फोटानंतर सुझान आणि हृतिक देखील त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. सुझान अभिनेता आणि मॉडेल अर्सनाल गोनी याला डेट करत आहे. तर हृतिक रोशन, गायक आणि अभिनेत्री सबा आझाद हिला डेट करत आहे. चौघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.