IPL मॅचच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगप्रकरणी तमन्ना भाटिया अडचणीत; बजावले समन्स

फेअरप्ले ॲपवर बेकायदेशीरपणे आयपीएल मॅचेसचे स्ट्रीम केल्याप्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला समन्स बजावण्यात आले आहेत. महाराष्ट्र सायबर सेलने हे समन्स बजावले आहेत. तमन्नाने या फेअरप्ले ॲपसाठी जाहिरात केली होती.

IPL मॅचच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगप्रकरणी तमन्ना भाटिया अडचणीत; बजावले समन्स
Tamannaah Bhatia Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 25, 2024 | 10:19 AM

फेअरप्ले ॲपवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बेकायदेशीर स्ट्रीमिंगप्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले आहेत. फेअरप्ले ॲपवर आयपीएलची बेकायदेशीर स्ट्रीमिंग केल्याने ‘वायकॉम 18’ समुहाला मोठा तोटा सहन करावा करावा. त्यामुळे समुहाच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबर सेलने तमन्नाला समन्स बजावले आहेत. तिला चौकशीसाठी सायबर तपास अधिकाऱ्यांसमोर 29 एप्रिल रोजी हजर राहावं लागणार आहे. याच प्रकरणात अभिनेता संजय दत्तलाही 23 एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्या तारखेला भारतात नसल्याने तो चौकशीसाठी हजर राहू शकला नव्हता. आपला जबाब नोंदवण्यासाठी त्याने सायबर सेलकडे आणखी वेळ मागितला आहे.

आयपीएलच्या सामन्यांच्या स्ट्रीमिंगचे हक्क ‘वायकॉम 18’ यांच्याकडे आहेत. मात्र फेअरप्ले ॲपवर बेकायदेशीरपणे सामन्यांचं स्ट्रिमिंग होत असल्याचं लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलने तक्रार नोंदवली. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी त्यांनी तमन्ना भाटियाला चौकशीसाठी बोलावलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेअरप्ले ॲपवर आयपीएलचे सामने बेकायदेशीरपणे स्ट्रीम केले जात होते आणि या सट्टेबाजीच्या ॲपला प्रमोट करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये तमन्ना भाटियाचाही समावेश होता.

फेअरप्ले बेटिंग ॲप नेमकं आहे तरी काय?

फेअरप्ले हे एक बेटिंग एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरून विविध प्रकारचे स्पोर्ट्स आणि एंटरटेन्मेंटशी संबंधित जुगार खेळला जातो. या ॲपच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, फेअरप्लेवर क्रिकेट हा सर्वाधिक आवडता खेळ आहे, त्यानंतर फुटबॉल आणि टेनिस यांना लोकांची पसंती आहे. या सर्व खेळांचे सामने फेअरप्लेवर थेट प्रक्षेपित केले जातात, जेणेकरून ॲपवर खेळाडूला (सट्टेबाजी करणाऱ्याला) एकाच वेळी खेळही पाहता येईल आणि रक्कमही जिंकता येईल, असंही त्यात म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

फेअरप्ले ही ‘महादेव’ ऑनलाइन गेमिंग ॲपची उपकंपनी आहे. या ॲपवरही क्रिकेट, पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल यांसारख्या विविध खेळांवर बेकायदेशीरपणे सट्टेबाजी लावली जाते. गेल्या वर्षी हे ॲप प्रचंड चर्चेत आलं होतं. अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी या ॲपसाठी जाहिराती केल्या होत्या. त्यामुळे त्यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात युएईमध्ये तब्बल 200 कोटी रुपये लग्नावर खर्च केल्यानंतर तपास यंत्रणांच्या रडावर ही ॲप आली होती. लग्नाच्या खर्चासाठी ही संपूर्ण रक्कम कॅशमध्ये देण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.