सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठे ट्विस्ट, मोठा खुलासा, गोळीबारानंतर हल्लेखोरांनी गुजरातलाच ‘का’ पलायन केले?, थेट..

Salman Khan home firing : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. 14 एप्रिलला सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात देखील घेतले आहे.

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठे ट्विस्ट, मोठा खुलासा, गोळीबारानंतर हल्लेखोरांनी गुजरातलाच 'का' पलायन केले?, थेट..
salman khan
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 9:50 PM

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सर्वचजण हैराण झाले. हेच नाही तर 14 एप्रिलला पहाटे पहाटे हा गोळीबार सलमान खान याच्या घरावर करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर एक मोठी खळबळ बघायला मिळाली. गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तब्बल वीस टीम तयार केला आणि अवघ्या काही तासांमध्येच हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. सलमान खान याच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोई याने घेतली, अनमोल लॉरेंस बिश्नोईचा भाऊ आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर हे हल्लेखोर थेट गुजरातमध्ये गेले. यावेळी हल्लेखोर हे पोलिसांना लोकेशन कळू नये, याकरिता सतत प्रवासाची साधणे बदल होते. हल्लेखोरांनी लपून बसण्यासाठी गुजरातच का निवडले याबद्दल आता थेट मोठा खुलासा झालाय. अनमोल बिश्नोई हा सतत हल्लेखोरांच्या संपर्कात असल्याचे देखील तपासात उघड झाले आहे.

अनमोल बिश्नोई याने हल्लेखोरांना सांगितले होते की, हल्ला झाल्यानंतर बिहारमध्ये अजिबातच यायचे नाही. कारण ते तुमचे मुळ गाव असल्याने पोलिस आरामात तुम्हाला पकडू शकतात. गुजरात आणि साऊथमध्ये जाण्यास अनमोल बिश्नोई याने हल्लेखोरांना सांगितले होते. काही दिवस लपून राहण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या.

राजस्थान, पंजाब, दिल्ली आणि हरिणाया या भागात बिश्नोई गॅंगचे नेटवर्क असल्याने अनमोल बिश्नोईने हल्लेखोरांना या भागात येण्यास मनाई केली होती. यामुळेच सर्वात सुरक्षेत राज्य अनमोल बिश्नोईला गुजरात वाटले. मात्र, अनमोल बिश्नोईचा प्लॅन इथेच फसला. मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांना अवघ्या काही तासांमध्येच ताब्यात घेतले.

सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी भुजच्या एका मंदिरातून अटक केली. विशेष म्हणजे या मंदिरात पोलिस हे वेशांतर करून केले होते. भाविक म्हणून पोलिस मंदिरात दाखल झाले. यावेळी हल्लेखोर मंदिरात एका कोणात झोपले होते. पोलिसांनी पकडल्यानंतर नेमके काय घडत आहे, हे हल्लेखोरांना काही वेळ समजलेच नाही.

Non Stop LIVE Update
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.