लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा सलमान खानला धमकी? कॅब बुकिंग करून अभिनेत्याच्या..

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान आज सकाळीच दुबईला रवाना झालाय. सलमान खान याचे विमानतळावरील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता.

लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा सलमान खानला धमकी? कॅब बुकिंग करून अभिनेत्याच्या..
salman khan
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 11:54 AM

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी 14 एप्रिल 2024 ची सकाळ अत्यंत हैराण करणारी ठरली. सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराच्या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. हेच नाही तर दोन हल्लेखोर दुचाकीवर आले आणि त्यांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार केला. एक गोळी तर थेट सलमान खान याच्या घरात देखील गेली. सलमान खान याच्या घराची बाल्कनी हल्लेखोरांच्या निशाण्यावर होती. खळबळजनक म्हणजे ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान घरातच होता.

या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांकडून वीस पथक तपासासाठी तयार करण्यात आली. गोळीबाराच्या घटनेंच्या अवघ्या काही तासांमध्ये हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी गुजरातमधील भुज येथून हल्लेखोरांना ताब्यात घेतले. सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, त्यामध्येच आता हा गोळीबार झाला.

लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली. आता नुकताच एक हैराण करणारा प्रकार पुढे आलाय. लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने एक कॅब बुक करून ती सलमान खान याच्या घरी पाठवण्यात आली. बुकिंगनुसार ओला चालक हा सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर येऊन थांबला.

चालकाने तिथे उपस्थित असलेल्या सिक्युरिटीला कॅब लॉरेन्स बिश्नोई नावाच्या व्यक्तीने बुक केल्याचे म्हटले. हैराण करणारे म्हणजे ही कॅब सलमान खान याच्या घरापासून ते वांद्रे पोलिस स्टेशनपर्यंत बुक करण्यात आली. सिक्युरिटीने लगेचच याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी कॅब चालकाकडून सविस्तर माहिती घेतली. हेच नाही तर या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याचे देखील कळत आहे.

20 वर्षीय व्यक्तीने ही कॅब बुक केल्याचे देखील कळत आहे. आता या प्रकरणात वांद्रे पोलीस चौकशी करत असल्याची देखील माहिती मिळत आहे. लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. परत कॅब बुकिंगच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खान याला धमकी देतोय का? यावर चर्चा रंगताना दिसत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आता सलमान खान स्पाॅट झाला असून तो दुबईला रवाना झाला.

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.