AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फॉलोअर्सच्या बाबतीत या 22 वर्षीय अभिनेत्रीने शाहरुखलाही टाकलं मागे; कोण आहे ती?

या अभिनेत्रीने इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या आकड्यात बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानलाही मागे टाकलं आहे. इतकंच नव्हे तर करीना कपूर आणि सारा अली खान यांनाही तिने टक्कर दिली आहे. 'खतरों के खिलाडी' या शोसाठी तिला सर्वाधिक मानधन मिळालं होतं.

फॉलोअर्सच्या बाबतीत या 22 वर्षीय अभिनेत्रीने शाहरुखलाही टाकलं मागे; कोण आहे ती?
या अभिनेत्रीचे फॉलोअर्स शाहरुख खानपेक्षाही जास्तImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 13, 2024 | 3:04 PM
Share

मुंबई : 13 मार्च 2024 | फिल्म इंडस्ट्रीत असे अनेकजण आहेत ज्यांनी बालकलाकार म्हणून एण्ट्री केली. चाइल्ड आर्टिस्ट बनून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप तर सोडलीच. पण मोठं झाल्यानंतर जेव्हा ते इंडस्ट्रीत परतले, तेव्हासुद्धा त्यांनी स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. या यादीत आलिया भट्टपासून श्रीदेवीपर्यंत अनेक कलाकारांचा समावेश होतो. अशाच एका टीव्ही अभिनेत्रीने सात वर्षांची असताना टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. आता मोठं झाल्यानंतरही ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीचा सोशल मीडियावर इतका मोठा चाहतावर्ग आहे, की फॉलोअर्सच्या आकड्यात तिने बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानलाही मागे टाकलं आहे. ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दुसरी तिसरी कोणी नसून जन्नत झुबैर आहे.

जन्नतने वयाच्या सातव्या वर्षी ‘चांद के पार चलो’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘दिल मिल गए’ या गाजलेल्या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली. या मालिकेमुळे जन्नत विशेष लोकप्रिय झाली. जन्नतला ‘काशी अब ना रहे तेरा कागज कोरा’ या मालिकेमुळेही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. त्यानंतर तिने ‘फुलवा’मध्ये भूमिका साकारली. या दोन्ही मालिकांमुळे जन्नतचं नशीब चमकलं आणि तिच्यासाठी बॉलिवूडचे मार्गही मोकळे झाले. ‘लव्ह का द एंड’ या चित्रपटात तिने श्रद्धा कपूरच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती.

जन्नतला इन्स्टाग्रामवर कोट्यवधी लोक फॉलो करतात. फॉलोअर्सच्या बाबतीत तिने शाहरुख खानलाही मागे टाकलं आहे. जन्नतचे इन्स्टाग्रामवर 49.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर शाहरुखचे 46.5 फॉलोअर्स आहेत. फक्त शाहरुखच नाही तर तिने करीना कपूर आणि सारा अली खान या अभिनेत्रींनाही मात दिली आहे. साराचे इन्स्टाग्रामवर 45 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर करीना कपूरचे 12 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

काही रिपोर्ट्सनुसार, जन्नतची एकूण संपत्ती ती 25 कोटी रुपयांच्या घरात आहे. ती दर महिन्याला जवळपास 25 लाख रुपये कमावते. ‘खतरों के खिलाडी’ या शोसाठी जन्नतला इतर स्पर्धकांपेक्षा सर्वाधिक मानधन मिळालं होतं. या शोच्या एका एपिसोडसाठी तिने 18 लाख रुपये फी घेतली होती. तर इन्स्टाग्रामवर प्रमोशनल पोस्टसाठी ती दीड ते दोन कोटी रुपये घेते.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....