मुलं कधी होणार, त्यांची नावं काय असणार?, बॉलिवुडच्या बाजीरावने सिक्रेट प्लॅनिंग उघड उघड सांगितलं!

बॉलिवूडचा बाजीराव मस्तानी म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाला 3 वर्षे पूर्ण होत आहेत.दीपिकाच्या प्रेग्नसीच्या अफवाही अनेक वेळा आल्या आहेत. पण आता रणवीरने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे.

मुलं कधी होणार, त्यांची नावं काय असणार?, बॉलिवुडच्या बाजीरावने सिक्रेट प्लॅनिंग उघड उघड सांगितलं!
Ranveer-Deepika

मुंबई : बॉलिवूडचा बाजीराव मस्तानी म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाला 3 वर्षे पूर्ण होत आहेत.दीपिकाच्या प्रेग्नसीच्या अफवाही अनेक वेळा आल्या आहेत. पण आता रणवीरने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे.

मुलांच्या जन्माबद्दल सर्व काही सांगितले

रणवीर सिंगने त्याच्या टीव्ही शोच्या पहिल्याच दिवशी स्फोट केला. शोमध्ये रणवीरने स्पर्धकांना सांगितले, ‘तुम्ही लोकांना माहीतचं आहे की, मी विवाहित आहे आणि आता मला 2-3 वर्षात मुले होतील. तुमची वहिनी लहानपणी इतकी सुंदर होती मी तिचे लहानपणीचे फोटो नेहमी बघतो. आणि म्हणतो एक अशीच एक मुलगी मला दे माझे आयुष्य सेट होऊ दे.

नावांची यादीही तयार आहे

एवढेच नाही तर रणवीर सिंगने हे रहस्य देखील उघड केले की तो त्याच्या भावी मुलांसाठी नावांची यादी देखील तयार करत आहे. तो म्हणाला, ”मी नावे शॉर्टलिस्ट करत आहे.”

नृत्याला मिळाली सर्वाकडून दाद

या व्हिडिओची सुरुवात रणवीर आणि स्पर्धक त्याच्या ‘राम लीला गोलियों की रसलीला’ या सर्वात प्रसिद्ध गाण्यांमधून ‘तात्त ताटाड’ नाचत आहेत. स्पर्धकाची आई देखील व्हिडीओमध्ये आहे. आणि आई तिच्या मुलाचे कौतुक करताना दिसली. ते पुढे म्हणाले की, त्यांना आशा आहे की त्यांच्या मुलगा त्यांचे भाग्य बदलेल आणि ते दीपिका पदुकोणसारख्या व्यक्तीशी लग्न करेल.

रणवीर या चित्रपटांमध्ये दिसणार आहे

रणवीर लवकरच ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या 83 चित्रपटात दिसणार आहे. रणवीर सिंह या चित्रपटात कपिल देवची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय रणवीर सिंह रोहित शेट्टीसोबत ‘सर्कस’ चित्रपटातही दिसणार आहे. त्याचबरोबर ‘जयेशभाई जोर्दार’ आणि ‘सूर्यवंशी’ हे चित्रपटही रणवीरच्या आगामी चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहेत. रणवीर ‘सूर्यवंशी’ मध्ये कॅमिओ करणार असला तरी. याशिवाय रणवीर सिंग दिग्दर्शक शंकर सोबतही दिसणार आहे.

इतर बातम्या :

गरिबांच्या भल्यासाठी काम करेन, NCB च्या समुपदेशनावेळी आर्यन खानचा वानखेडेंना शब्द

Video | ‘नराज’ नाही ‘नाराज’, अशुद्ध हिंदीमुळे जेव्हा शाहरुख खानला खावी लागली होती बोलणी, रेणुका शहाणेंनी सांगितला भन्नाट किस्सा…

‘वच्छी आत्या’ फेम अभिनेत्री वर्षा दांदळेंना भीषण अपघात, मणक्याला दुखापत, पायही मोडला

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI